Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी तसेच डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे विद्यापीठ पुरस्काराने सन्मानित

चोपडा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी तसेच डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे विद्यापीठ पुरस्काराने सन्मानित

27

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.20डिसेंबर):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सहा.प्रा. डॉ.एल.बी.पटले व मराठी विभागातील सहा. प्रा.डॉ.एम.एल.भुसारे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकताच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जळगाव, धुळे, नंदुरबार अशा तीन जिल्ह्यांमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्यांना दरवर्षी ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांना प्राप्त झाला. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सहा.प्रा. डॉ.एल.बी. पटले यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा उल्लेखनीय संशोधन कार्य केल्याबद्दल ‘संशोधन पुरस्कार स्वामित्व हक्क (पेटंट) तसेच ‘संशोधन पुरस्कार संशोधन प्रकाशन (रिसर्च पब्लिकेशन)’ असे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठी विभागातील सहा.प्रा.डॉ.एम.एल.भुसारे यांनाही २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा ‘संशोधन पुरस्कार स्वामित्व हक्क(पेटंट)’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.के.बी.पाटील तसेच विद्यमान कुलगुरू प्रोफेसर डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, डॉ.एल.बी.पटले व डॉ.एम.एल.भुसारे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच डॉ.एल.बी. पटले व डॉ.एम.एल.भुसारे यांना विद्यापीठातर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here