✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.18डिसेंबर):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चे वर्तमान सरकार हे कन्फयुज सरकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे शपथ विधी झाले, नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण मुख्यमंत्री मंत्री खातेवाटप करू शकत नाही आहे. हे अधिवेशन बिनाखात्याच्या मंत्रिमंडळाचे अधिवेशन आहे. हे जनतेच्या काय समस्या सोडवेल? असा सवाल बि. ई. एफ चे महाराष्ट्र प्रदेश चे सचिव सिद्धार्थ सुमन यांनी केले.ते नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे सुरु असलेल्या धरणे आंदोलनात आंदोलकांना मार्गदर्शन करतांना सिद्धार्थ सुमन बोलत होते. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. शेषराव रोकडे, उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, संघटना सचिव सिद्धार्थ डोईफोडे, सचिव सिद्धार्थ सुमन, सचिव नरेश मूर्ती हे करीत आहेत.
ते पुढे म्हणाले या बिनाखात्याच्या सरकारचे हे अधिवेशन बिनकामी ठरणार आहे. ना खात्याचे मंत्री, ना विरोधीपक्ष नेता अश्या स्थितीत हे अधिवेशन होत आहे. अशा अधिवेशनावर आपण आंदोलन करीत आहोत. हरकत नाही संघर्षाची ही मशाल आपण ठेवत ठेवू. असे ते म्हणाले.बहुजन एम्प्लॉईज ऑफ इंडिया च्या वतीने नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशवर कामगार, कर्मचारी, शिक्षक प्राध्यापक, भूमिहीन शेतमजूर यांच्या विविध मागण्याकरिता धरणे आंदोलन सुरु आहे.
या आंदोलनात अकोला महानगर पालिकेतील 11 शिक्षक कर्मचारी व कामगारांचे बडतर्फी रद्द करून त्याचा आर्थिक लाभ द्यावा, खत्री कालेज चंद्रपूर येथील 8 प्राध्यापकांचे वेतनवाढीची रक्कम त्वरित द्यावी, अशोक चिमणकर यांचा वीस वर्षाचा थकीत पगार त्वरित द्यावा, वनवासी माध्यमिक विद्यालय गोंडखैरी जि. नागपूर, मौजा लोंढेसांगवी ता. लोहा ज़िल्हा नांदेड येथील सरकारी जमीन सर्व्हे नं 219 वरील भूमिहीनांचा कब्जा कायम करून मालकी हक्काचे पट्टे द्यावे, राजहंस वंजारी रा. राणबोडी ज़ि नागपूर यांचा पुनर्वसनाचा आर्थिक मोबदला त्वरित देण्यात यावा, पुलगाव नगरपालिका ज़ि वर्धा येथील घुबडटोली येथील पूरग्रस्त लोकांना इंदिरा नगर येथे पुनर्वसितांना जमिनीचे पट्टे व घरकुल योजना त्वरित लागू करावी या मागण्यांचा समवेत आहे.
महाराष्ट्रात नुकतेच विरजमान झालेले महायुतीचे सरकार अंतर्गत समस्यांनी ग्रासलेले दिसत आहे. ते जनतेच्या समस्या सोडविण्यास सक्षम नाही अशीच आजची परिस्थिती आहे.नव्या सरकारचे हे नागपुरातील अधिवेशन बिनाखात्याच्या मंत्रीमंडळाचे हे बिनाकामी अधिवेशन ठरते आहे.येथे आमच्या समस्यांना दाद जरी मिळाली नाही तरी हा लढा बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया चालूच ठेवणार असल्याचा निर्धार या आंदोलनादरम्यान करण्यात आला.