✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.17डिसेंबर):- महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व मान्यवर कांशीराम यांचे मिशन पुढे चालवीण्याच्या उद्देशाने चिमूर तालुका अध्यक्षपदी नुकतीच अमित हरीदास भिमटे यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव मनिष साठे यांनी भिमटे यांची कार्यालयीन नियुक्ती पत्राव्दारे ही जबाबदारी सोपविली आहे. नुकत्याच झालेल्या चिमूर विधानसभा निवडणूकीत भिमटे आजाद समाज पार्टीच्या तिकीटावर रणांगनात उतरले होते. त्यानी प्रस्तापित पक्षाच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकाची मते घेतली होती. वाढता जनसंपर्क व संघटन कौशल्याची दखल घेऊन पुढे आजाद समाज पार्टीचे पाळेमुळे मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांना ही नियुक्ती देण्यात आली आहे.
https://www.purogamisandesh.in/news/82967
भिमटे यांच्या नियुक्ती बाबत अजय गजभिये, शुभम गजभिये, निखिल रामटेके ,सुमित गजभिये, अंकित दहिवले, सागर बोरकर, दीक्षांत शेंडे, टिनू गजभिये, वेदांत गजभिये, आर्यन मेश्राम, चिराग पाटील, हर्षल गजभिये, पियुष वरखेडे ,वेदांत बोरकर, तेजस शेंडे, नैतिक पाटील, प्रशिक बहादुरे, निलेश आत्राम आदी ने अभिनंदन केले आहे.