✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.14डिसेंबर):-राजकारण म्हटलं की, काहीच अंतिम नसते. मात्र, तरीही तुम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहिलात की, जनता तुमच्या कामाची नोंद घेत असते. तीचं नोंद तुम्हाला विजयाचा गुलाल लावत असते. त्यामुळे काम करीत राहिले पाहिजे. तेव्हाच जनतेच्या आशीर्वादाने फळ मिळते, हा शिरस्ता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी अवघ्या महाराष्ट्राला घालून दिला आहे. त्यामुळे अतिशय निर्णायक काळात सलग दोन वेळा मला विजयी करून इतिहास जन्माला घालणाऱ्या माय-बाप जनतेपुढे कायम नतमस्तक आहे, असे भावनिक प्रतिपादन स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
विधानसभा निवडणूक विजयाच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध समाज घटकांकडून परभणी ते गंगाखेड प्रवासादरम्यान आ.डॉ.गुट्टे यांचे जागोजागी जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोखर्णी नृ, पोखर्णी फाटा, बनपिंपळा निवासस्थानी, राम-सीता सदन जनसंपर्क कार्यालय तसेच इतरही विविध ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून आपल्या मतदारसंघाचा रखडलेला विकास पुन्हा कार्यान्वित करून त्यास चालना देण्यात मला जरी यश आले असले तरी, ते केवळ आपल्या पाठींब्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे तुमची साथ, सोबत आणि आशीर्वाद हेचं माझं भांडवल आहे. तेचं भांडवल घेवून मी आजपर्यंत वाटचाल करीत आलो आहे. म्हणून मला विरोधकांची कधीच चिंता नसते. कारण, माझा पॅटर्नच वेगळा आहे. तो विरोधकांना कधीही समजणार नाही. त्यांनी जास्तीत-जास्त टीका करून वाटेल ती भाषा वापरली, म्हणूनच आपले मताधिक्य वाढले, ही गोष्ट विरोधक सुध्दा मान्य करतील. तरीही आगामी काळात मोठ्या उत्साहाने मतदारसंघाच्या सेवेसाठी सज्ज होण्याचा निर्धार केला आहे.
तीन तालुक्याच्या या मतदारसंघात विकासाचा समतोल राखण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. गावोगावी असलेल्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी संबंधित गावातील जनतेला विश्वासात घेवून सकारात्मक पद्धतीने पुढे वाटचाल करायची आहे.
त्यामुळे आता झाले गेले विसरून एकदिलाने कामाला लागू. आणखी नव्या जोमाने विकासाची घौडदौड आणखी गतिमान करू, असेही आ. डॉ. गुट्टे यांनी म्हटले.विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदा मतदारसंघातील जनसामान्य नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेले हे उत्साही स्वागत आणि दिलेल्या शुभेच्छा खूप मोलाच्या आहेत. असे प्रेम करणारे असंख्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते असल्यामुळे काम करताना नेहमी ऊर्जा आणि बळ मिळते. त्यामुळे राजकीय चौकटीच्या बाहेर जाऊन या सर्वांशी आत्मीय नाते निर्माण झाले आहे. ते नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात सुविधांची समृद्धी निर्माण करण्यासाठी इथून पुढे कार्यरत राहणार आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दिलेली सर्व आश्वासने आणि शब्द पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम सुध्दा करणार आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिक, पदाधिकारी कार्यकर्ते व इतरांकडून जागोजागी झालेल्या या जंगी स्वागतावेळी ‘कोण आला रे, कोण आला रासपचा वाघ आला’, ‘गुट्टे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘जनतेचा आहे एकच नारा, गुट्टे साहेबच आहे खरा’, ‘कोण म्हणतं होतं येणार नाही, आल्याशिवाय राहीला नाही’, अशा विविध घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.