Home महाराष्ट्र रा.काँ.श.प.पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन

रा.काँ.श.प.पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन

33

▪️पाटाचे आर्वतन लवकर सोडा; अन्यथा आंदोलन – कल्पिता पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.13डिसेंबर):-येथील पाटबंधारे विभागाला रब्बी हंगामाला पाटाचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी पाऊस समाधानकारक झालेला आहे त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. असं असतांना देखील डिसेंबर महिना अर्धा होत आला तरी अद्यापपावेतो पाटाचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. सत्तास्थापन करण्यात मशगुल असलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही यासंदर्भात जाब विचारण्याच्या उद्देशाने आज शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाच्या वतीने पाटाचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात यावे तसेच पाटचाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासंदर्भात निवेदन राजेंद्र भदाणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पाटबंधारे विभागात गेल्यानंतर लक्षात आले तिथे पुरेसे कर्मचारी नाहीत त्यामुळे कामाचा व्याप काही निवडक लोकांवर पडतो. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले की, जर पाटाचे पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच शेतकऱ्यांच्या रोषाला आपणांस सामोरे जावे लागेल.

निवेदन देण्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष अजयशेठ पगरिया, संजय पाटील, दिपक वाघमारे, प्रा.एन.डी.पाटील, बाळू पाटील, रविंद्र पाटील, रंगराव सावंत, मोहन पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, डॉ.नितीन पाटील, काँग्रेसचे बंटी पवार, दिनू पाटील, शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख जयदीप पाटील, महिला तालुका प्रमुख जनाआक्का पाटील, नईम काझी, उज्वल पाटील, अमित शिंदे, प्रा.आर.एन.भदाणे, अनिल पाटील, अमोल हरपे, निलेश चौधरी, हिरामण जाधव, नारायण चौधरी, सुरेश पवार, भूषण चव्हाण, हितेंद्र पाटील, प्रमोद जगताप, देवेंद्र देसले, साईनाथ पाटील, अभय पाटील, सुनिल पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, सुभाष माळी, महारु माळी, खलील खान, रमेश महाजन, महेंद्र पाटील, सागर महाले, सागर चव्हाण, नगर मोमीन, सागर वाजपाई, कृष्णा कंखरे, प्रफुल पवार, राहुल पाटील, नाना पाटील, प्रकाश लांबोळे, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, पृथ्वीराज कंखरे, हरिष विसावे, किशोर सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here