✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि.13डिसेंबर):– जळगाव येथील आर.एल. चौक एमआयडीसी परिसरातील प्रसिध्द फरसाण विक्रेते बाबा नमकीन अँड बाबा स्वीट यांनी नूतन वर्षाचे कॅलेंडर छापले. या कॅलेंडर मध्ये फेब्रुवारी महिन्यात कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत रामदास स्वामींचा फोटो छापण्यात आला आहे. संभाजीनगर येथील खंडपीठाने १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार छत्रपती शिवराय व रामदास स्वामी यांचा थेट संबंध असल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत, असे असतांना हा फोटो छापणे चुकीचे आहे.
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट जेव्हा बाबा नमकीन चे मालक सुशिल तलरेजा यांना लक्षात आणून दिली तेव्हा तलरेजा यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच जिथून हे कॅलेंडर छापण्यात आले त्यांना सूचना दिल्यात आणि उर्वरित कॅलेंडरची वाटप तात्काळ थांबवण्यास सांगितले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश बोरसे, दिनेश पाटील, प्रेम तलरेजा, शेख अलिन शेख इस्माईल, प्रसन्न वाणी, मनोहरलाल थोराणी, दिपक पाटील आदी उपस्थित होते.