Home चंद्रपूर परिवारातील लोकांनी मुलांसमोर मोबाईल चा वापर टाळणे म्हणजे शाश्वत विधार्थी घडणे :...

परिवारातील लोकांनी मुलांसमोर मोबाईल चा वापर टाळणे म्हणजे शाश्वत विधार्थी घडणे : डॉ. मंगेश गुलवाडे

132

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13डिसेंबर):-राणी राजकुंवर प्राथमिक शाळा, चंद्रपूर येथे दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व राणी राजकुंवर भगिनी समाज संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हा अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मंगेश गुलवाडे (अध्यक्ष, अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी वर्ष समिती, चंद्रपूर तसेच मा.जिल्हाध्यक्ष, भाजपा, चंद्रपूर) होते. प्रमुख वक्त्या म्हणून सौ. अश्विनी सोनवणे (शिक्षणाधिकारी प्रा. वि.चंद्रपूर) या उपस्थित होत्या.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित नृत्य-नाटिका, गीत, व नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. प्रमुख पाहुण्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करत, सामाजिक विकासासाठी त्यांच्या विचारांचा उपयोग करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपल्या भाषणात आजच्या गतिमान युगात गुणवंत विद्यार्थी घडविता येतो त्या करिता परिवारातील लोकांनी मुलांसमोर मोबाईल चा वापर टाळणे म्हणजे शाश्वत विधार्थी घडणे हे ब्रीद पालकांना सांगितले, व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हस्त लिखित नवं ऊर्जा या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले.

प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या सौ. अश्विनी सोनवणे (शिक्षणाधिकारी प्रा. वि.चंद्रपूर )यांनी आपल्या भाषणात विशेष बाब म्हणून कुटुंबातील एक तरी व्यक्तींनी आपल्या अपत्या सोबत वाचन करावे असे सांगितले.
जल्लोष चिमुकल्यांचा या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे निमंत्रण पत्रिका ही विद्यार्थ्यांनी स्वतः हस्तलिखित स्वरूपाची करून मान्यवरांना पाठविली .

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सौ. वैशाली दुर्योधन , राणी राजकुवर भगिनी समाज चंद्रपूरच्या अध्यक्ष सौ. प्राजक्ता भालेकर, उपाध्यक्ष माधवी ताई भागवत,सचिव सौ. मुग्धा पाठक, शिक्षकवृंद, पालक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सौ.रागिनीताई नंदुरकर व सौ.स्नेहा मिसार यांनी केले तर आभार सौ.सरिता सोनकुसरे यांनी मानले.हा वर्धापन दिन व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here