Home महाराष्ट्र फुले एज्युकेशन तर्फे आटपाडी मध्ये,संघर्ष योद्धा विलास खरात सन्मानित

फुले एज्युकेशन तर्फे आटपाडी मध्ये,संघर्ष योद्धा विलास खरात सन्मानित

92

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.13डिसेंबर):-डबई कुरणातील १५६ हेक्टर जमीन सभासद, वारसांच्या मालकीची करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत 1998 पासून विलास खरात यांनी आटपाडी गावापासून मंत्रालयापर्यंत संघर्ष ,विनंती पत्रे योग्य पुरावे अनेकवेळा सादर करून मोठी लढाई करून अखेर महाराष्ट्र शासन जी.आर काढला गेला.त्या जी.आर.ची सखोल माहिती ,पुढील कार्यवाही साठी वारसाने काय कागदपत्रे दिली म्हणजे व्यक्तिगत सात बारा होईल या साठी बैठक आटपाडी पंचायत समिती सभागृहात नुकतेच रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 ते 4 बैठक सम्पंन झाली.या प्रसंगी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन पुणेचे वतीने हा संघर्ष लढा यशस्वी पार पाडल्याबद्दल आणि शासन जी.आर.काढला त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी मा.विलास खरात यांचा व इतर सहकाऱ्यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ आणि नुकतेच अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा झाला म्हणून भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथ भेट दिला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन खरात म्हणाले की
आटपाडीमध्ये मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महसूल अधिकारी, मंत्रालाय, अधिकारी यांना आणून त्यांचे हस्ते 67 सभासदांना 7/12 वाटप करू या आणि विशेष सत्कार विलास खरात यांचा देखील करू या असे म्हंटल्यावर सर्व उपस्थित जन समुदायानी टाळ्याचा गडगडाट करीत हात उंचावून अभिनंदन ठराव देखील मंजूर केला.

तर विलास खरात म्हणाले की आटपाडी मधील महार सामुदायिक शेती संस्थेच्या ६७ शेतकरी सभासद आणि त्यांच्या वारसांना तब्बल २५ वर्षांच्या अथक संघर्षानंतर डबई कुरणातील १५६ हेक्टर इतकी जमीन शासनाने कब्जेहक्काने कायमस्वरूपी दिली. या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संस्थेच्या ६७ सभासद व वारसांची नावे लागली व ही जमीन त्यांच्या मालकीची लवकरच होणार आहे.त्यासाठी ही लढाई जो पर्यत व्यक्तिगत 67 जणाचे नावावर 7/12 होत नाही तो पर्यंत संपणार नसून त्या जी.आर.चे आपल्या सर्वांकडून उल्लघन होणार नाही याची देखील आपणास काळजी घ्यावी लागणार आहे असे सांगून 18 अटीचे सखोल वाचन देखील विलास खरात यांनी केले.

या वेळी सचिन खरात, यशवंतमोटे, गौतम खरात, दिपक खरात, आप्पा खरात, नामदेव मोटे, पत्रकार राहुल खरात, नंदकुमार खरात, अशोक मोटे, रमेश मोटे, जगन्नाथ खरात इत्यादी मान्यवर व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
स्नेही रमेश टकले सह इतर सभासदांनी विलासराव यांचे मनापासून आभार मानीत त्यांच्या इतर सामाजिक कर्यासोबत हे मोठे केलेले कामाचे कौतुक करीत येत्या नगर पंचायतच्या इलेक्शनमध्ये सहभागी होऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढावी अशी तीव्र इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विषय पत्रिकेचे वाचन दीपक खरात यांनी केले तर आभार सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here