Home महाराष्ट्र परभणी घटनेच्या निषेधार्थ बहुजन बांधवांचे फलटण तहसीलदार यांना निवेदन

परभणी घटनेच्या निषेधार्थ बहुजन बांधवांचे फलटण तहसीलदार यांना निवेदन

42

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.13डिसेंबर):- परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरुने दगड मारून मोडतोड केली या घटनेचा जाहीर निषेध म्हणून फलटण, जि. सातारा येथील बहुजन बांधवानी फलटण तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध केला व अशा घटना पुढील काळात होऊ नयेत यांची काळजी घेण्याचे आवाहन करणेत आले.

बहुजन समाज फलटण यांचे वतीने देणेत आलेल्या निवेदनात जाहीर निषेध करताना परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ लावण्यात आलेली भारतीय राज्यघटनेची प्रतीमा जाणीव पुर्वक एका ईसामा कडून मोडतोड करण्यात आली विटंबना करणाऱ्यात आली.

तरी भारतीय संविधान हे देशाचे एकतेचे, अखंडतेचे, समतेचे,स्वतंत्राचे, बंधुताचे प्रतिक असुन अशा संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोही चा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी सदर घटनेचा आम्ही बहुजन समाज फलटण जाहीर निषेध करतो व पोलिस प्रशासनाने निरपराध लोकांना वर आत्याचार न करता आपली भूमिका कायद्याने पार पाडावी ही विनंती करतो असे म्हटले आहे.यावेळी निवेदन देतेवेळी लक्षण काकडे,अजित संभाजी मोरे,सुनिल राजाराम पवार, राहुल शिलंवत,रवी कांबळे अजित कांबळे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here