Home महाराष्ट्र गंगाखेड येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी

गंगाखेड येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी

33

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13डिसेंबर):-महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती गंगाखेड शहरातील मुख्य भगवती चौकात साजरी करण्यात आली. महापुरुष जयंती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त गोदावरी गंगा स्वच्छता दूत ॲड अशोक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

सर्व महापुरुषांच्या जयंत्या विविध जाती-धर्मियांच्या वतीने एकत्रितपणे साजरी करण्याचा पायंडा गंगाखेड येथे सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य चौकात स्व. मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या स्मृतींना ऊजाळा देण्यात आला. तसेच स्वच्छता दूत ॲड कुलकर्णी यांची जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव , माजी जि. प. सदस्य प्रल्हाद झोलकर, बाळासाहेब राखे सर, बालासाहेब पारवे, संयोजक माधवराव चव्हाण, नारायण घनवटे, डिगंबर यादव, श्रीपाद कोद्रीकर, विशाल मुंडे, शिवराज मुंडे, ईस्त्याक अन्सारी, महेश राव शेटे, डॉ. सचिन सुपेकर, पप्पू मोटे, नेमीचंद नखत जैन, देवीदास नेजे, सर्जेराव घनवटे यांच्यासह महापुरुष जयंती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, शहरातील व्यापारी बांधव व नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here