Home अमरावती अमरावती मनपामध्ये प्रथम महिला स्थायी समिति सभापतीपदाने सन्मानित सौ.राधा राजू कुरील एक...

अमरावती मनपामध्ये प्रथम महिला स्थायी समिति सभापतीपदाने सन्मानित सौ.राधा राजू कुरील एक आदर्श समाजसेवी – प्रा.अरुण बुंदेले

25

▪️कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान व श्री संत लहानुजी महाराज मित्रमंडळीचे आयोजन 

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.12डिसेंबर):-संत रविदास महिला गौरव केंद्रीय पुरस्कार प्राप्त सौ.राधा राजू कुरील यांना शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्यात रुची होती.सन 2007 च्या अमरावती मनपा निवडणुकीत त्या वार्ड क्र.40 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या.नगरसेवक असताना वार्ड क्र .40 मध्ये त्यांनी अप्रतिम कार्य केल्यामुळे त्यांना कधी मागे बघण्याची वेळ आली नाही. 2007 ला त्या विधी समितीच्या सदस्य,2008 ला शिक्षण समितीच्या सदस्य,2009 ला शहर सुधार समितीच्या सदस्य,2010 पासून 2012 पर्यंत स्थायी समितीच्या सदस्य,2010 ला महाराष्ट्र शासन तालुका भ्रष्टाचार समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ति झाली होती तेव्हा त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीची मोहीम राबविली होती.2013 ते 2016 पर्यंत बीजेपीच्या भाजपा महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा होत्या.

2017 मध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.12 रुक्मिणी नगरमध्ये नगरसेविका झाल्यानंतर त्यांनी तेथील अनेक समस्या सोडविल्या.2019 ला स्थायी समितीच्या पुन्हा सदस्य झाल्या.2017 पासून 2022 पर्यंत जिल्हा नियोजन समिती च्या सदस्य होत्या.अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथम महिला स्थायी समिती सभापती पदाचा मान सौ.राधा कुरील यांना मिळाला. 2022 मध्ये बिजेपीच्या अमरावती शहराच्या उपाध्यक्ष होत्या.2023 ला यवतमाळ विधानसभा प्रमुख होत्या.शांतता समिती पोलीस आयुक्तालय अमरावतीच्या सदस्य होत्या.त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ” संत रविदास महिला गौरव पुरस्कार ” केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया यांच्या हस्ते दिल्ली येथे प्राप्त झाला तर 2020 मध्ये “नारी तुझे सलाम ” हा सन्मान मिळाला.

स्वतःला मिळालेल्या प्रत्येक पदातून त्यांनी समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला होता ; म्हणूनच आज त्या एक आदर्श समाजसेवी म्हणून नावारूपास आलेल्या आहेत.सौ.राधाताई या सुस्वभावी व शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी जीवनात अनेक उत्तम गोष्टी करून स्वतः सोबतच समाजाचेही जीवन घडविले.त्यांचे पती श्री राजू भाऊंनी तथा राहुल व रोहन या त्यांच्या पुत्ररत्नांनी व सौ.नेहा व सौ.निशा या त्यांच्या कन्यारत्नांनी त्यांना या कार्यात पूर्ण साथ दिल्यामुळे त्या सभापती पदापर्यंत पोहोचल्या.त्यांच्या पुढील कार्याला मी सुयश चिंतितो आणि त्यांचे अभिष्टचिंतन करतो.” असे विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

ते कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती, श्री संत लहानुजी महाराज उद्यान मित्र मंडळी, उपेक्षित समाज महासंघ (अध्यक्ष,प्रा.श्रीकृष्ण बनसोड ) आणि सत्यशोधक समिती, अमरावती (अध्यक्ष,श्री विनोद इंगळे )तर्फे अमरावती मनपाच्या प्रथम महिला सभापती व आदर्श नगरसेविका सौ.राधा राजू करील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत लहानुजी महाराज गार्डन, नारायण नगर,अमरावती येथे दि .11 डिसेंबर 2024 ला संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात विचार व्यक्त करीत होते.

अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” सौ.राधा कुरील ” या स्वरचित अभंगाचे गायन केले.या अभिष्टचिंतन कार्यक्रमात कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बा.बुंदेले यांनी तसेच श्री संत लहानुजी महाराज उद्यान मित्रमंडळी,उपेक्षित समाज महासंघ,सत्यशोधक समिती तर्फे डॉ.विजय राठी, प्रा.ढाकुलकर मॅडम, प्रा.डॉ. सहदेव तानकर,डॉ.सुरेशराव मालपे,माजी मुख्याध्यापिका स्मिता गोळे,शर्मा सर,प्रा.शर्मा मॅडम,श्रीमती देव मॅडम,श्रीमती नलिनी सिरसाठ, धीरज सिरसाठ, प्रकाश देशमुख यांनी तथा श्री संत लहानुजी महाराज उद्यान मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी अभिष्टचिंतन करून वाढदिवसानिमित्त उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी प्रा.डॉ.सहदेव तानकर व सौ.भाग्यश्री टोलीवाल यांनी आपल्या मनोगतातून सौ. राधा कुरील यांचे अभिष्टचिंतन केले ; तर उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड व सत्यशोधक समाज समितीचे अध्यक्ष श्री विनोद इंगळे यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राज ऐरोबिक्स झुंबा व योगा सेंटर संचालिका सौ.भाग्यश्री टोलीवाल,प्रणाली वाडेकर,शुभांगी देशमुख,सीमा खान,श्वेता जैन,शिल्पा नघट, डॉ.सुभाष पनपालिया,राहुल राजू कुरील,रोहन राजू कुरील,नेहा मनीष दिवाण, निशा विशाल चंदन,डॉ.सावदेकर,डॉ.विजय कळंबे, सौ.सरोज शुक्ला, महेश शुक्ला, संजय व्यवहारे, सविता जोशी मॅडम,जयवंत सवाई,सौ. अर्चना सवाई ,सुभाष ढेपे, रमणलालजी मुंधडा,सुनील मोरे,सुवास झाडे,विद्या मॅडम,जयश्री बोबडे मॅडम,वसुकर सर,विनायकराव घुलक्षे,नंदलाल राठी,गुल्हाने मॅडम,गुल्हाने सर,बोंडे,प्रवीण विघे,राजूभाऊ ठाकरे, तिडके सर, प्रवीण विघे,धवल विघे, कोळसे सर, कोळसे मॅडम, सौ.मधु राठी, मिश्रा मॅडम, नरेश वानखडे,स्वप्निल नावंदर ,भस्मे मॅडम,छाया मिश्रा मॅडम,दयाराम जाधव,दिनेश सिंग,प्रभाकर माहोरे यांनी अभिष्टचिंतन केले.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here