Home अमरावती ” प्रा.डॉ.संजय गुडधे एक आदर्श व्यक्तिमत्व ” – प्रा.अरुण बुंदेले

” प्रा.डॉ.संजय गुडधे एक आदर्श व्यक्तिमत्व ” – प्रा.अरुण बुंदेले

36

▪️” कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान व श्री संत लहानुजी महाराज मित्रमंडळीचे आयोजन “

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.9डिसेंबर):-प्रा.डॉ.संजय गुडधे यांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बत्तीस वर्षे सेवाकार्य करून हजारो विद्यार्थ्यांना घडविले आणि शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचे आदर्श विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. रसायनशास्त्राचे अध्यापन करताना त्यांनी विविध उपक्रम व प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत.प्रा.डॉ.गुडधे सरांनी ज्युनिअर कॉलेज टीचर्स क्लब तयार करून त्याद्वारे कॉमन टेस्ट एक्झाम सहा जिल्ह्यांमध्ये घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य केले.

रसायनशास्त्रामध्ये १९९२ मध्ये पीएचडी करून सरांचे रसायनशास्त्रातील पंधरा रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले. सन :१९८१ मध्ये मंदबुद्धी व शारीरिक अपंग विकास संस्था अमरावतीला सरांनी स्थापन करून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.आज अमरावती येथील वलगाव रोडवरील हर्षराज कॉलनीमध्ये सरांनी १९८१ मध्ये स्थापन केलेले मंदबुद्धी व शारीरिक अपंग विद्यालय असून तेथे आज पन्नास विद्यार्थी संख्या आहे तर अमरावती मधील मार्डी रोडवर १९८४ ला नूतन मूकबधिर विद्यालय स्थापन केले असून तेथे आज ६५ विद्यार्थी संख्या आहे तर तेथील होस्टेलमध्ये ५० मुलं-मुली आहेत. सरांनी केलेल्या या कार्यात त्यांची भार्या प्रा.रेखा गुडधे यांची पूर्णपणे साथ मिळाली व आजही मिळत आहे.असे हे विद्यार्थ्यांवर व दिव्यांगांवर प्रेम करणारे आदर्श व्यक्तिमत्व प्रा. डॉ. संजय गुडधे सरांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो व पुढील कार्यासाठी सुयश चिंतितो.”असे विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी व्यक्त केले.

ते कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती आणि श्री संत लहानुजी महाराज उद्यान नारायण नगर मित्र मंडळी तर्फे विद्यार्थीप्रिय – मूकबधिर व दिव्यांगांवर प्रेम करणारे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथून सेवानिवृत्त झालेले प्रा.डॉ.संजय गुडधे व प्रा.सौ.रेखा गुडधे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त – हस्ते राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम ) सरांचा बाहत्तरावा वाढदिवस सपत्निक दि.५ डिसेंबर २०२४ ला श्री संत लहानुजी महाराज उद्यान नारायण नगर,अमरावती येथे संपन्न झाला. त्यावेळी विचार व्यक्त करीत होते.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” डॉ.संजय गुडधे ” या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
उस्फूर्तपणे संपन्न झालेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी तसेच श्री संत लहानुजी महाराज उद्यान मित्रमंडळीतर्फे डॉ.विजय राठी, प्रा. ढाकुलकर मॅडम, प्रा.डॉ. सहदेव तानकर, डॉ.सुरेशराव मालपे,माजी मुख्याध्यापिका स्मिता गोळे,शर्मा सर, प्रा.शर्मा मॅडम, श्रीमती देव मॅडम, श्रीमती नलिनी सिरसाठ,जयवंत सवाई, सौ.अर्चना सवाई, धीरज सिरसाठ, प्रकाश देशमुख यांनी तथा श्री संत लहानुजी महाराज उद्यान मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी अभिष्टचिंतन करून वाढदिवसानिमित्त मनोगतातून उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी स्मिता गोळे मॅडमनी ” डॉ संजय गुडधे ” या अभंगाचे वाचन केले .

याप्रसंगी राजू कुरील, सौ.राधा कुरील ( माजी नगरसेविका ), डॉ. सुभाष पनपालिया ,डॉ.सावदेकर,डॉ.
विजय कळंबे, सौ.सरोज शुक्ला, महेश शुक्ला, संजय व्यवहारे, सविता जोशी मॅडम, सुभाष ढेपे, रमणलालजी मुंधडा,सुनील मोरे,सुवास झाडे,विद्या मॅडम, जयश्री बोबडे मॅडम,वसुकर सर, विनायकराव घुलक्षे,नंदलाल राठी,गुल्हाने मॅडम,गुल्हाने सर,बोंडे, प्रवीण विघे, राजूभाऊ ठाकरे, तिडके सर, धवल विघे, कोळसे सर, कोळसे मॅडम, सौ. मधु राठी, मिश्रा मॅडम, नरेश वानखडे, स्वप्निल नावंदर ,भस्मे मॅडम, छाया मिश्रा मॅडम,दयाराम जाधव, दिनेश सिंग, प्रभाकर माहोरे यांनी अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here