✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगाव(दि.9डिसेंबर):-स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर राजेंद्र राजपूत तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, लोकमतचे प्रतिनिधी भूपेंद्र मराठे, पारोळा भूषण संपादक भिका चौधरी, दिव्य मराठीचे प्रतिनिधी अभय पाटील, पुण्यनगरीचे प्रतिनिधी रमेश जैन, सकाळ चे प्रतिनिधी संजय पाटील, लोकमत ग्रामीण चे प्रतिनिधी राकेश शिंदे, महाराष्ट्र सारथी चे प्रतिनिधी प्रकाश पाटील तसेच सर्व शितल अकॅडमी चे संचालक उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन टायगर इंटरनॅशनल स्कूल पारोळा येथे करण्यात आले स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शितल अकॅडमीच्या २५ ब्रांचेस मधून एकूण तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामधील दोन राउंड स्व शाखेस घेण्यात आले व राज्यस्तरीय फायनल राऊंड साठी प्रत्येक शाखा मधून ०३ विद्यार्थी निवडण्यात आले व २५ शाखा मधून १०० विद्यार्थी फायनल राउंड साठी निवडण्यात आले टायगर इंटरनॅशनल स्कूल पारोळा येथे आयोजित राज्यस्तरीय फायनल वकृत्व स्पर्धा मधील प्रथम विजेता म्हणून पिंपळनेर शाखेचा विद्यार्थी आयुष अहिरराव याने बक्षीस म्हणून १११११/- रुपये सन्मानचिंन्ह पटकावले व द्वितीय क्रमांक गुंजन शेवाळे बक्षीस म्हणून एल.ई.डी. टीव्ही व सन्मानचिंन्ह पटकावले व तृतीय क्रमांक गायत्री थोरात बक्षीस म्हणून सायकल व सन्मानचिंन्ह पटकावले तसेच शितल अकॅडमी च्या प्रत्येक शाखेमधून बेस्ट स्पीकर काढण्यात आला व बक्षीस म्हणून पाचशे रुपये रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले बेस्ट स्पीकर म्हणून निवडण्यात आलेले विद्यार्थी धनश्री महानुभव पारोळा, कोमल पाटील कासोदा, जानवी महाजन एरंडोल, रिशिता अकलाडे पिंपळनेर, सुयश गायकवाड धुळे, मृण्मयी कासार चांदवड, ओजस्वी चौधरी नंदुरबार, मानवी गिरासे तळोदा, मनीष पाटील धुळे, मृणाल भावसार धरणगाव, दिशांत मनोरे पाचोरा निकीता शेलार मालेगाव, प्रांजल अहिरे देवळा या सर्व मुलांना बेस्ट स्पीकर म्हणून गौरवण्यात आले व स्पर्धेचे व्यवस्थापनाचे काम शशिकांत महाजन सर विजय पाटील सर यांनी पाहिले तसेच रवींद्र पाटील पारोळा, रोहन पाटील पाचोरा, भरत पाटील धुळे, वाल्मीक पाटील पिंपळनेर, राकेश महिरे नंदुरबार, अंकिता पाटील कासोदा, विजय पाटील एरंडोल, योगेश पाटील धुळे, समाधान पाटील तळोदा, श्याम पाटील देवळा, मनोज शेवाळे चांदवड, अरुण सैंदाणे मालेगाव या सर्व शितल अकॅडमीच्या संचालकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीरितीस पार पाडण्यासाठी शितल अकॅडमी चे प्रिन्सिपल मंगेश पवार शिक्षक हेमंत परदेशी अभिषेक पाटील व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन मोरे सर यांनी केले.