✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)
चिमूर(दि.9डिसेंबर):-पंचायत समिती चिमुर अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हाळगांव, केंद्र जामगांव, बीट भिसी येथील मुख्याध्यापक मनोहर शंकरराव महाकाळकर यांचा त्यांच्या पत्नी अल्का महाकाळकर यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन शंकरपुर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी स्वप्नील खांडेकर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भिसी बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी विशाल बोधाणे, प्रमुख पाहुणे महात्मा फुले विद्यालय महालगांव (कालु) चे मुख्याध्यापक हंसराज गजभीये, केंद्र प्रमुख जामगांव विजय निनावे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक भोंबले, उपाध्यक्ष राखी घरत, ग्रामपंचायत कन्हाळगांवचे सरपंच विजेंद्र घरत, येरखेडाचे मुख्याध्यापक विनोद भोयर, महालगांव (काळु) चे मुख्याध्यापक रविंद्र उरकुडे, जामगांवचे मुख्याध्यापक विलास राजुरकर, साधन व्यक्ती रविंद्र आत्राम, प्रेमदास पौनीकर पंचायत समिती चिमुर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून मालार्पण केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून तसेच पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक मनोहर महाकाळकर व त्यांची पत्नी अल्का महाकाळकर यांचा उपस्थित मान्यवरांनी शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन महालगांव (काळु) चे शिक्षक संजय मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार विषय शिक्षक तुळशीराम बेलखोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता शिक्षिका जिजा चलाख, वत्सला घुमडे, स्वयंसेवक स्वप्नील भुसारी आदीने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील गावकरी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मुख्याध्यापक मनोहर महाकाळकर यांना निरोप देतांना विद्यार्थी भावुक होवुन डोळ्यातुन अश्रु काढण्यास सुरुवात केली.