Home महाराष्ट्र संदीप मोरे यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर

संदीप मोरे यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर

26

✒️हवेली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

हवेली(दि.9डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडीचे वाघोली तालुका हवेली मधील प्रभाग क्रमांक ४ चे अध्यक्ष संदीप मोरे हे तळागाळातील व गरीब जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे एक खरे समाजसेवक म्हणून ओळखले जात असून त्यांच्या ह्या विशेष सामाजिक कार्यासाठी त्यांना माणुसकी मल्टी पर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रपती सेवा गौरव पुरस्कार २०२५ मधील आदर्श समाज रत्न या पुरस्कारासाठी निवड झाली असून रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी हा पुरस्कार त्यांना मलकापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व पुणे शहर उपाध्यक्ष हिरामण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी वाघोली प्रभाग क्रमांक ४ चे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष उल्लेखनीय कार्य करीत आहेत, वाघोली गावातील बऱ्याच गोष्टींची सुधारणा व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संदीप मोरे यांनी अविरतपणे कार्य केले असून सामान्य जनतेचे विविध प्रश्न जनतेवर होणारा अन्याय अत्याचार, सामाजिक अडीअडचणी असतील तर सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा एक समाजसेवक म्हणून संदीप मोरे यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here