✒️यवतमाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.9डिसेंबर):- जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून मार्ग हक्काचा सन्मानाचा घोष वाक्यावर आधारीत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या माध्यमातून शहरात आज २ डिसेंबर रोजी जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. स्थानिक समता मैदान येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
प्रभात फेरीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रमेश मांडण जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस. चव्हाण, जिल्हा नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सागर जाधव, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवी पाटील, डॉ. अविनाश बोरीकर,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी एआरटी केंद्र व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रिती दास यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाजन नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी पथनाट्य सादरीकरणातून एचआयव्ही/एड्स बाबत माहित दिली.
त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत सर्वांनी शपथ घेतली. प्रभात फेरीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधीकरण व न्याय विभागासह शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रभात फेरीचे संचालन व आभार विशाल शेजव यांनी मानले. प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी डाप्कू, आयसीटीसी, एआरटी कर्मचारी व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, चे गणेश मानुसमारे, प्रदीप शेंडे , नीरज किणेकर, ऋषिकेश राठोड, प्रिया अक्कलवार, प्रीती राठोड,पायाल पाटील, मुस्कान चव्हान, शुभम तोटे, उमेश पवार,संतोष देवतळे, उमाशंकर कुलसंगे यांचा सहभाग होता.