✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.9डिसेंबर):- बीकेसी ट्रस्टच्या माध्यमातून निश्चित समाजकार्य करत नेत्र शिबिर होऊन गरजूवंतांना अंधारातून प्रकाशमय करण्यासाठी कांकरिया परिवार सातत्याने पुढाकार घेत असतो असे प्रतिपादन शिबिराचे उद्घाटक तहसीलदार उषा शृंगारे यांनी केले.
स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या 48 व्या पुण्यस्मृति निम्मित दि.08 डिसेंबर रोजी गंगाखेड शहरात भव्य रक्तदान शिबिर व मोफ़त नेत्र तपासनी शिबिराचे आयोजण करण्यात आले होते या शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल या अभियाना अंतर्गत आनंद ऋषीजी नेत्रालय विजन सेंटर, अहमदनगर. यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिरांतर्गत 150 रुग्णांची तपासणी करत 30 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिये साठी निवड व 10पडद्याची शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली.
यावेळीशिबिराचे उदघाटन प्रसंगी तहसीलदार माननीय उषा किरण श्रृंगारे मॅडम,गंगाखेड मार्केट कमिटीचे संचालक मुन्ना शेठ काबरा, महेश बँकेचे अध्यक्ष घनश्यामजी मालपाणी, डॉ.सिद्धार्थ भालेराव, संतोष तापडिया, डॉ राठोड मॅडम रक्तदान शिबिर व मोफ़त नेत्र तपासनी शिबिराच्या संयोजिका सौ मंजूशा दर्डा उपस्थिति होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा दर्डा यांनी केले.
या वेळी मंजुषा दर्डा यांच्या बालमित्र सवंगडी ने विठ्ठल रुक्मिण ची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला होता.
रक्तदान शिबिरामध्ये आकर्षणाचे केंद्र म्हणून सेल्फी पॉईंट तैयार करण्यात आले होते,तसेच राठोड दाम्पत्यानी रक्त दान करून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.सर्व रक्तदात्याना प्रशस्तीपत्र देण्यात आले.सर्व रक्तदात्यांनी अति उत्साहाने सेल्फी झोन मधून आपला फोटो काढला. मेट्रो रक्तपेढी शासकीय रुग्णालय परभणी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाला.
आयोजक भोलारामजी कांकरिया बहुउद्देश्यीय चैरिटेबल ट्रस्ट तसेच सहसहयोगी संयोजक सवंगडी कट्टा,
राजस्थानी सेवा संघ,गोकुळ ग्रुप,आर्य वैश्य महासभा, सखी ट्रस्ट ,सर्व पत्रकार बांधव गांगाखेड, कार्यक्रमाच्या यशस्वी साठी ऋषभ दर्डा, अमर गंगाखेड़कर, आनंद धोका, विजय बंग, नंदकुमार सोमान,रमेश औसेकर, रमेशचंद धोका, मनोज नाव्हेकर,हर्ष आंधळे, शुभम जामगे, बालाजी पुरणाळे, अभिजीत देशपांडे आदिनी सहकार्य केले.