▪️पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब !- पी डी पाटील
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी पाटील)
धरणगांव(दि.6डिसेंबर):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक एच डी माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील जेष्ठ शिक्षिका एम के कापडणे होते. प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भावेश गवले व जया सोनवणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनपट सांगितला. शाळेतील उपक्रमशिल शिक्षक पी डी पाटील यांनी सत्यशोधक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक – सामाजिक कार्य विशद करून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.
पुस्तकांसाठी घर बांधणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय असे प्रतिपादन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा एम के कापडणे यांनी बाबासाहेबांनी शिका – संघटित व्हा- आणि संघर्ष करा हा मूलमंत्र सांगून बाबासाहेबांना पुस्तके वाचून आदरांजली देऊया असा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.