✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.6डिसेंबर):-सर्वांना मानवी हक्क आणि अधिकार प्रदान करून जातिय व्यवस्थेचे बळी बळी ठरलेल्या लोकांना स्वाभिमानी जिवन बहाल करणारे, संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे चंद्रपूर येथील मेन रोडवर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते स्मृतिचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा. डॉ .टी.डी.कोसे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव संजय खोब्रागडे, जिल्हा संघटन सचिव नवनाथ देरकर, शहर संघटन सचिव आशिष गेडाम, शहर सचिव प्रा.भाऊराव मानकर, सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे भास्कर सपाट,दिलीप होरे, निळकंठ पावडे,जिवतोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.