✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.5डिसेंबर):-येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती तसेच संशोधकवृत्ती विकसित होऊन त्यातून युवा संशोधक निर्माण व्हावेत, या उद्देशाने दि.०५ डिसेंबर २०२४ गुरुवार रोजी ‘जिल्हास्तरीय अविष्कार २०२४ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते.
या ‘अविष्कार-२०२४’ स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मा.दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख तसेच प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लाइफ सायन्सचे तसेच ‘अविष्कार स्पर्धा-२०२४’ उपक्रमाचे निरीक्षक प्रा.डॉ.पी.आर.पुराणिक, कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेश सिताराम पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य गोविंदा बापू महाजन, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विश्वनाथ अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सौंदाणकर, पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अत्तरदे, सर्व विद्या शाखांचे परीक्षक तसेच जळगाव जिल्हा अविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉ.व्ही.आर. हुसे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या ‘अविष्कार स्पर्धा-२०२४’ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांमधील एकूण ८०२ संशोधक विद्यार्थ्यांनी तसेच जळगाव जिल्ह्यातून आलेल्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ‘अविष्कार’ पोस्टर्स व मॉडेल्स स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले.
याप्रसंगी ‘अविष्कार-२०२४’ स्पर्धेचे निरीक्षक प्रा.डॉ.पी.आर.पुराणिक म्हणाले की, ‘अविष्कार स्पर्धा’ संशोधक विद्यार्थी घडविते तसेच त्यांच्यातील संशोधकवृत्ती निर्माण करते. विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण ठामपणे व आत्मविश्वासाने करावे, म्हणून ही विद्यार्थ्यांना उत्तम संधी असते. उत्तम सादरीकरणासाठी वाचन, शब्द व माहितीचा स्रोत हा महत्त्वाचा भाग असतो. विद्यापीठातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे’.यावेळी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख म्हणाले की, ‘अविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले मत, विचार, कल्पना मांडता येतात व त्याचे सादरीकरण करता येते. ‘अविष्कार’ स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती जोपासण्याचे व विकसित करण्याचे मुक्त व्यासपीठ आहे’.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘अविष्कार सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण नव संकल्पना सादरीकरणाची संधी मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व आपले विचार आणि ज्ञानाचे उपयोजन करावे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शैलेशकुमार वाघ व सौ. सुनिता पाटील यांनी केले तर आभार जळगाव जिल्हा अविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉ.व्ही.आर.हुसे यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांमधील एकूण ८०२ विद्यार्थी, संघ समन्वयक, परीक्षक तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘जिल्हास्तरीय अविष्कार-२०२४’ स्पर्धेचे नियोजन, आयोजन समिती सदस्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी या सर्वानी परिश्रम घेतले.
या ‘अविष्कार-२०२४’ स्पर्धेच्या आयोजन व नियोजनासाठी अविष्कार स्पर्धेचे स्थानिक सल्लागार समितीप्रमुख व प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.शैलेश वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील तसेच अविष्कार संयोजन समितीचे प्रमुख व समन्वयक डॉ.व्ही.आर.हुसे आणि सह-समन्वयक डॉ.डी.डी.कर्दपवार यांचे मार्गदर्शन लाभले.