🟡 या ०९ डिसेंबरला “बिमा सखी” योजनेचा होणार शुभारंभ प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या – पुजा कुरंजेकर
✒️पुरोगामी न्यूज साकोली(किशोर बावणे)
साकोली(दि.5डिसेंबर):-महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असतांनाच आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने महिलांना अजून एक सौगात दिली आहे ती म्हणजेच “बीमा सखी योजना” म्हणजेच लाडक्या बहिणींचे पैसेही दरमहा त्यांना मिळत आहे व आता त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी विमा योजनेतून प्रत्येक महिलांचा “जींदगी के साथ भी..जींदगी के बाद भी” असे ब्रिद वाक्य असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून त्यांच्या जीवन विमेचाही विचार करून अशी एक अभिनव योजना अंमलात आणली आहे. व यात प्रत्येक महिलांचा रोजगार, आर्थिक प्रगती असा विकास कसा होईल याकडे केंद्र सरकारने अगदी अभिनव पाऊल उचलले आहे. याबद्दल साकोली शहरातील प्रत्येक महिलांच्या भविष्य निधींसाठी झटणारी मुख्य विमा सल्लागार पुजा नरेश कुरंजेकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे यांच्या या “पीएम बीमा सखी” महिला योजनेबाबद त्यांच्या वीमा महिला समुह कडून हार्दिक मनस्वी आभार व्यक्त केले आहे व या भविष्यातील प्रगतीसाठी अविरत राहणाऱ्या या बीमा सखी योजनेचा जास्तीत जास्त महिला वर्गांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
🔵 भारत सरकार देशातील सर्व महिलांना रोजगार देण्यासाठी व महिलांना स्वलंबी बनविण्यासाठी विविध योजना सुरू करीत आहे. त्या योजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अंतर्गत मोदी सरकारच्या योजनेचा एक भाग म्हणून “प्रधानमंत्री बिमा सखी” योजनेचा शुभारंभ सोहळा पानीपतहून सोमवारी ०९ डिसेंबरला होत आहे. ही योजना भारतीय महामंडळाच्या अंतर्गत चालविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत देशातील अनेक महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
🔵 प्रधानमंत्री बिमा सखी योजना ही महिलांना रोजगार देणारी एक योजना असल्यामुळे महिलांमध्ये या योजनेबद्दल बरीच उत्सुकता आहे. या योजनेत महिलांना काम करून पैसे कमविण्याची संधी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिला जे सुशिक्षित आहे अशा महिलांचे शिक्षण वाया जाऊ नये त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करता यावे. तसेच शिक्षण शिकुन महिला फक्त घरापुरते मर्यादित राहू नये. त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त व्हावे. जे महिला कुठलेही काम न करता स्वतःचा संसार चालविण्यासाठी “चूल आणि मूल” या दोन गोष्टीशी अवलंबुन आहेत त्यांना बाहेर निघून दोन पैसे कमविण्याची सवय लागावी व घरसंसार चालविण्यासाठी त्यांचा स्वतःचा परिवार चालविण्यासाठी हातभार लागावा या दृष्टीकोनातूनच भारत सरकार ने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री बिमा सखी योजना सुरू करीत आहे.
🔵 सुशिक्षित महिला आज शिक्षण घेऊन घर कामाव्यतिरिक्त काहीच काम करीत नसेल तर त्यांच्या शिक्षणाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे सुशिक्षीत महिलांना शिक्षणाचा पुरेपूर उपयोग घेता यावा याकरिता काहीतरी काम करणे आवश्यक झाले आहे. विमा क्षेत्र असे क्षेत्र आहे की, ज्या मध्ये सुशिक्षीत महिला आपला घरसंसार सांभाळून व भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा एजन्सी चे काम करून या दोन्ही कामात समन्वय साधून आपले काम योग्य प्रकारे करू शकतात. त्यामुळे खास करून महिलांनी यामध्ये पुढाकार घेऊन विमा क्षेत्रात काम करावे व स्वतः विमा योजनाचा लाभ घ्यावा आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाची विमा एजन्सी घेऊन ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ दयावा असे आवाहन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेतील (सी. एल. आय. ए) अभिकर्ता पुजा नरेश कुरंजेकर यांनी सर्व सुशिक्षीत महिलांना केले आहे.
🔵 बिमा सखी योजनेत फक्त १० पास महिलाच या योजनेसाठी आवेदन फॉर्म भरू शकतात. महिलांना या योजनेंतर्गत जितक्या जास्त बिमा करणार तितका जास्त कमीशन त्यांना मिळणार असून सोबतच मासिक वेतनही देण्यात येणार आहे. महिलांना या अंतर्गत तीन वर्ष मासिक वेतन मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी ६०००/- रुपये, तिसऱ्या वर्षी ५०००/- रुपये मासिक वेतन मिळणार. या योजनेत साधारणतः १८ वर्ष ते ५० वर्ष वयोगटातील महिला आवेदन करू शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी खासकरून इच्छुक महिलांनी साकोली शाखेतील महिला अभिकर्ता मुख्य जीवन विमा सल्लागार (सी. एल. आय. ए) पुजा नरेश कुरंजेकर यांनी आवाहन केले. तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी वरील फोन ९४०५६७१५०९ संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.