Home महाराष्ट्र बाबा…. तुमच्या चळवळीची ६८ वर्षात कशी दुर्दशा झाली?

बाबा…. तुमच्या चळवळीची ६८ वर्षात कशी दुर्दशा झाली?

60

निसर्गाचा नियम आहे जो जन्मा येतो. तो एक दिवस मृत्यू पावतो. निसर्ग नियमाने सर्वच प्राणी माणस जगतात, काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात.कोण किती दिवस जगला त्याला काही महत्व नाही. कसा जगला आणि काय केले, त्याला जगात खूप महत्व आहे. भारतात असा एकमेव व्यक्ती आहे जो केवळ एक पाव खाऊन व दोन गिलास पाणी पिऊन शिक्षण घेत होता. त्याच्या त्या परिश्रमाने त्यागाने त्याने आपले नांव अजरामर करून ठेवले तो जाऊन आज ६८ वर्ष झाले तरी त्याला देश विसरल्याला तयार नाही. असा एकमेव पुरुष नव्हे तर महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याच्या मृत्यूला महापरिनिर्वाण दिन म्हणतात. तो बहुजन समाजा करिता दुखाचा दिवस आहे, असे म्हटल्या जाते. पण गेल्या काही वर्षा पासून महार, दलित, बौद्ध समाज व त्याच्या संस्था, संघटना, पक्ष महापरीनिर्वाण दिन आहे हे विसरले आहेत. महापरीनिर्वाण दिनाला जत्रेचे स्वरूप आले आहे. जत्रेतील गर्दी वर्ड रिकार्ड तोंडणारी आहे. पण राजकीय वैचारिक शक्ति त्यात दिसली नाही.

लोकसभा विधानसभा निवडणूक संपल्या आमच्या संघटना पक्ष आणि समाज कुठेही दखल पात्र ठरला नाही. पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना सिंहा सारखे जगावे लागते. समोरून पहिले तर प्रत्येकांना त्याच्या नजरेत भय आणि आदर वाटला पाहिजे आणि मागून पहिले तर तो अनेकांचे तिरस्काराचे बाण खाऊन रक्त बंबाळ झालेला असतो.ते आज पर्यत कोणीच मनावर घेतले नाही, त्यामुळे सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धर्मिक, राजकीय संस्था, पक्ष संघटना “एक नां धड भराभर चिंद्या” झाल्या आहेत. क्रांतीकारी विचारधारा तोंडात असते आणि आचरणात लाचारी. यामुळेच पक्ष संघटना वाढत नाही. पक्ष, संघटना एकखांबी नेतृत्व झाल्या आहेत. त्यासाठी लोकशाहीच्या नांवावर लाचारी करणारे एकखांबी नेतृत्व निर्माण झाले आहे. गोरगरिबांना न्याय देणारी न्याय व्यवस्था राहिली नाही. गरीब कार्यकर्त्यांना लाथा, आणि श्रीमंत कार्यकर्त्यांना पायघड्या देणारे नेतृत्व जास्त काळ टिकत नाही. ते नेहमीच अस्तित्वासाठी तडजोड करीत असते.त्यात त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. नुकसान हे समाजाचे व चळवळीचे होते.त्यावर चर्चा होत नाही. लोकसभा विधानसभा निवडणुकीत एड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची लक्षवेधी भूमिका ठरत होती. तिच्या बदल खोटा प्रचार करण्याचे काम सोन्याचे, चांदीचे, स्टीलचे चमचे बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, लेखक, सेवानिवृत अधिकारी, सुरक्षित नोकरी करणारा आरक्षणचा लाभार्थी अशी मंडळी इमानदारीने करीत होती हे आपण सोशल मिडियावर वाचले व पाहिले असेलच. 23 नोव्हेंबर नंतर या सर्वांचा सर्व पातळीवरून कसा धुवा उडाला हे आपण पहिले आहे.म्हणून म्हणतो बघाना बाबा तुमच्या चळवळीची ६८ वर्षात कशी दुर्दशा झाली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार समाजाने वाजोटे ठरविले आहेत. या देशातील विविध जाती धर्माचे प्रांताचे लोक भारतीय संविधानाने एकत्र राहू शकतात असे अनेक विचारवंत सांगतात.हे जर शंभर टक्के खरे आहे. तर आंबेडकरी समाज एकसंघ का राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी संविधान स्वीकारले त्याचा स्वभिमान जागा झाला आहे.त्याचे कल्याण व विकास झाला आहे. त्यामुळेच विविध संस्था, संघटना, पक्ष निर्माण होतात त्यांनी संविधानाच्या चौकटीत काम केले तर त्या वाढतात. नाही केले तर संपतात.
बाबासाहेबाच्या समता सैनिक दलाच्या धर्तीवर राष्टीय स्वयंसेवक संघ (आर एस एस ) निर्माण झाली असे सांगितल्या जाते. त्याच्या हजारो वेगवेगळ्या संस्था संघटना असल्या तरी त्याचे सामाजिक, शौक्षणिक, राजकीय उधिस्ट एक असते. म्हणून ते किती हि वेगवेगळे असले तरी एक असतात.या उलट आंबेडकरी चळवळीचे झाले आहे.ते विचाराने कितीही एक असले तरी ते कधीच एक नसतात, मग तो अन्याय, अत्याचार, हत्याकांडाची रमाबाई, खैरलांजी, सोनई, खडी, जवखेडा असो.ते वेगवेगळे लढणारच. मग सांगा यांना एक बाबासाहेब मान्य आहे काय?. त्याच बाबासाहेबांनी लिहलेली भारतीय राज्यघटना, संविधान यांना मान्य आहे काय?.जर हे मान्य असेल तर कोणत्याही कुटुंबाची दुर्दशा होणारच मग ते प्रकाश असो की आनंद, उद्धव असो कि राज, तशी चळवळीची ही दुर्दशा होणारच कारण त्याला कोणतीही निमावली लागू नाही.
महापरिनिर्वाण दिन एकाच महापुरुषाचा देशात मानला जातो. देशात अनेक सम्राट ह्र्दय सम्राट झाले. त्याचा स्मृर्तीदिन कधी आला आणि गेला तो कोणाला कळत सुद्धा नाही.

पण डॉ.बाबसाहेब आंबेडकर असे महामानव आहेत त्याच्या स्मृतीदिनाची जगात दखल घेतल्या जाते. त्याच्या त्या महापरीनिर्वाण दिनाला काही लोक मोठ्या प्रमाणात गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. कोण आहेत ते? शिवाजी पार्क आणि परिसरात खेळणे, कपडे विकू नये असे सांगितल्या जाते. तरी मोठ्या प्रमाणात दुकाने का लागतात. मग दुकानदार कोण व खरीददार कोण?. कॅसेट सीडी चा मोठा आवाज करून गोंगाट करू नका असे पोलीस विनती करून सांगतात. तरी त्यांना न जुमानता आवाज करणारे कोण?संविधानाच्या कलमानुसार पोलिसांनी कारवाई केली. तर काय होईल? यावर चळवळीच्या नेत्याचे नियंत्रण आहे काय? काय करते महापरीनिर्वाण समन्यव समिती? चैत्यभूमी विकास समिती? हे काही करू शकणार नाही. कारण यांना संविधानच मान्य नाही. काही कार्यकर्त्याची, नेत्याची वर्षभराची कमाई (एक ते आठ डिसेंबरमध्ये) या मधून होते असे अनेक अधिकारी खासगीत सांगतात. त्यामुळे महापरीनिर्वाण दिनाला हिणकस वळण लागताना दिसत आहे. त्याला एक नेता, एक संघटना, एक पक्ष जबाबदार नाही. त्याला जबाबदार आहे आंबेडकरी चळवळ आणि समाज जबाबदार आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीची दुर्दशा झाली.

चळवळीची दुर्दशा होण्यासाठी काही कॉम्रेड नी हातभार लावला असे म्हणणे चूक ठरणार नाही. इतर समाजाला महापरीनिर्वाण दिवसाचा खूप त्रास होतो, त्यांना एवढी गर्दी पाहून धडकी भरते ते माणस आहेत हेच काही लोकांना मान्य नाही त्याच्या अंगावरील कपड्याचा घाण वास येतो ते परिसारत घाण करतात. असे अनेक आरोप लावल्या जातात. हेच आरोप लावणारे इतर समाजाच्या नऊ / दहा दिवस चालणाऱ्या धांगडधिंगाला मोठया उत्सवाने स्वीकारतात. त्याचा वाहतूक,ध्वनी प्रदूषण, त्याच्या कडून घाण होत नाही का? त्याची तुलना महापरीनिर्वाण दिनाशी होत नाही. आंबेडकरी चळवळ संघटना पक्षा बाबत त्यांना विचारले तर जे सत्य सांगणार नाहीत माहित असून त्यांना या बाबत विचारणे म्हणजे आंबेडकरी चळवळीत असंतोष पसरविणे नाही काय ?

बाबसाहेब च्या वेळी जिवाला जिव देणारे सहकारी आंबेडकरी चळवळीत होते, अनेक समस्या वर अभ्यासपूर्ण माहिती घेवुन ते संघटना पक्ष चालवत होते. आजचे कार्यकर्ते नेते वाट पाहतात कधी कुठे पुतळयाची विटंबना होते कुठे आमच्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते कुठे अन्याय अत्याचार आणि हत्याकंड घडते आणि आम्ही मोर्च्या आंदोलन करून तोडपानी करतो, त्याचे भांडवल करून आमच्या नांवाची पार्टी बनवितो. काही घडलेच नाही तर आम्ही गप्प बसणार नाही पुतळ्या ची स्वछता करून सुशोभीकरण करा. नाही तर आम्ही आमरण उपोषण करतो. या रेल्वे स्टेशनला हे नांव द्या नाही तर ते करतो अशी ही चळवळ बाबासाहेबाची होती काय ? महापरी निर्वाण दिनी जन आंदोलन करून नेते बनू पाहणारे खरेच आंबेडकर वादी असू शकतात काय ?याच्या घरी यांचा माय बाप मेले असते. त्या दिवसी यांनी असे आंदोलन केले असते? याच दिवसी जेलभरो करून, सामुहिक आत्मदहन करणारे आंबेडकरी विचार आणि चळवळ पुढे नेणारे असू शकतात? यांनी कोणी केली ही चळवळीची दुर्दशा? माझ्या तमाम जागृत समाज बांधवा नो हिच वेळ आहे आपल्या बाबाच्या महापरीनिर्वाण दिनाच्या दिवशी आत्मचिंतन करण्याची, आता किती वेळ सांगणार इतिहास वाचल्या वर इतिहास घडविता येतो. येणारी पीढी आपला 50 वर्षाचा इतिहास वाचेल. तेव्हा सांगा त्याना नामांतर साठी किती वर्ष लढ़लो आणि नामविस्तर करून समाधान पावलो. पुतला विटंबना झाल्या मुले रमाबाई हत्याकांड घडले. मनोहर कदम चे काय झाले. खैरलांजी, सोनाई, खर्डा, जवखेडा हत्याकंडाचा इतिहास लिहावा लागेल ते पुढील पिढी वाचेल नंतर बाबासाहेबाचा इतिहास वाचेल. तेव्हा ते विचारतील सांगना बाबा तुमच्या चळवळीची ६८ वर्षात कशी दुर्दशा झाली. बाबासाहेबाना विनम्र अभिवादन करताना हा प्रश्न प्रत्येकानी स्वताला विचारवा हेच खरे विनम्र अभिवादन असेल.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here