✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.4डिसेंबर):- जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून मार्ग हक्काचा, सन्मानाचा एड्स टाळा नैतिकता पाळा या घोषणा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एन सी सी 3 गर्ल्स महाराष्ट्र बटालियन युनिट च्या वतीने दिनांक ४ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एन सी सी विभाग प्रमुख लेप्ट.सरोज शिंगाडे यांच्या नेतृत्वात सर्वप्रथम उपस्थित विद्यार्थ्यांना एड्स विरोधी शपथ घेऊन महाविद्यालयातून रॅलीला सुरुवात करण्यात आली.सदर रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून गांधी नगर, हनुमान नगर या भागातून एन सी सी 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन च्या कॅडेट्स नी जनजागृती पर घोषणा देत रॅली काढून ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळेस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रीतम खंडाळे यांनी रॅली चे स्वागत करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच समुपदेशक प्राजक्ता देवगडे यांनी एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी शासन युद्ध पातळीवर कार्य करीत आहेत शासनाच्या वतीने एड्स नियंत्रणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.या आजाराबाबत भीती अथवा गैरसमज न बाळगता समुपदेशन व उपचारासाठी आरोग्य केंद्रात यावे अशी माहिती दिली त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातून रॅली आगेकूच करीत पोलीस वसाहत रोड ने महाविद्यालयात जाऊन रॅली ची सांगता झाली.या रॅलीत एन सी सी 3 महाराष्ट्र गर्ल्स युनितवच्या सर्व कॅडेट तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.