Home चंद्रपूर तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू-रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद ...

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू-रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के-नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

148

 

 

 

चंद्रपूर दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी . यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here