✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमुर(दि.3डिसेंबर):-विरांगना मुग्दाई आदिवासी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व माना जमात मुग्दाई मंडळ डोमा यांच्या विद्यमाने दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता चिमुर तालुक्यातील पहाडी परिसर डोमा येथे विरांगना मुग्दाई जयंती व नागदिवाळी महोत्सव तथा जेष्ठ समाज सेवकांचा सत्कार तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थी अभिनंदन समारंभाचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रम्हपुरीचे सेवानिवृत्त शिक्षक गुलाब हनवते, प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणुन सामाजिक विचारवंत नागपुर इंजि. गोपाल खाबाडकर, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, सामाजिक कार्यकर्ता भद्रावती देविदास जांभुळे, माना आदिम जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष सुभाष नन्नावरे, प्रकल्प अधिकारी लाटकर, सुधाकरराव चौखे, माजी अध्यक्ष राहुल दडमल, सामाजिक कार्यकर्ता चंद्रपुर हरिदास श्रीरामे, शंकर भरडे, तंटामुक्ती समिती डोमाचे अध्यक्ष कारुजी मुन, डोमाचे सरपंच विशाल नन्नावरे, विजय दांडेकर, अंकुश नन्नावरे, श्रीकांत एकुंडे, बळीराम गडमडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुरचे सभापती मंगेश धाडसे, आशिष भरडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी चिचखेडाचे पोलीस पाटील विलास जांभुळे, शामराव दांडेकर, भाऊ राव दडमल, निलकंठ दडमल, मुरलीधर रंधई, भाऊराव दडमल आदीचा सत्कार करण्यात येणार असुन डॉ. मयुर नन्नावरे, डॉ. राकेश दडमल, डॉ. दडमल, सेट परिक्षा उत्तीर्ण अमोल ढोणे, मनस्वी श्रीरामे, डॉ. गोपीचंद गजभे, कृषीभुषण सुरेश गरमळे, प्रा. डॉ. संदिप नन्नावरे यांचे अभिनंदन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेरणा विरांगना मुग्दाई आदिवासी सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. रामराव नन्नावरे, उपाध्यक्ष गोवर्धन चौधरी, अर्जुन कारमेंगे, सहसचिव धनंजय दडमल, सचिव पुरुषोत्तम रंधये, कोषाध्यक्ष सुरेश गायकवाड, सदस्य दशरथ नन्नावरे, नामदेव चौधरी, देविदास दडमल आदीने केले आहे.