✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.3डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत ईव्हीएम विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे
आंदोलनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली.
गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा संघटक तथा लातूर जिल्हा पक्षनिरीक्षक
शुद्धोदन सावंत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 3 डिसेंबर रोजी गंगाखेड शहरात स्वाक्षरी मोहीम आंदोलनला सुरुवात करण्यात आली या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला याप्रसंगी शुद्धोदन सावंत यांनी म्हटले की EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला असून गंगाखेड शहर व तालुक्यातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही केले.
पुढे बोलताना सावंत यांनी म्हटले की गंगाखेड तालुक्यातून स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करून टप्प्याटप्प्याने परभणी जिल्ह्यात ही स्वाक्षरी मोहीम आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही म्हटले या आंदोलनात पंडित पारवे, नवनाथ साळवे, रमेश जोंधळे, अभिनंदन मस्के, लहू केदारे, गोरखनाथ कांबळे, रमेश सूर्यवंशी,केवळ साळवे,प्रफुल्ल सावंत यांच्या सह वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला