Home महाराष्ट्र शब्दगंधच्या पाथर्डी शाखेची बैठक संपन्न

शब्दगंधच्या पाथर्डी शाखेची बैठक संपन्न

21

 

पाथर्डी – साहित्य क्षेत्रात नवोदितांसाठी विविध उपक्रम राबवणारी शब्दगंध ही साहित्यिक संस्था असून लिहित्या हातांना बळ देण्याचे काम शब्दगंध च्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सभासदत्व नवोदितांनी स्वीकारावे, असे आवाहन माजी प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या पाथर्डी तालुका शाखेची बैठक शाहीर भारत गाडेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अशोक दौंड, राज्य कार्यकारिणी चें उपाध्यक्ष भारत गाडेकर, बंडूशेठ दानापुरे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.ढाकणे म्हणाले की, नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम शब्दगंध च्या वतीने होत असून पाथर्डी शाखेच्या वतीने जास्तीत जास्त उपक्रम राबवले जात आहेत,ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण शब्दगंध हे पाथर्डी – शेवगावकरांच्या अस्मितेच सांस्कृतीक प्रतीक आहे.
प्राचार्य दौंड यावेळी बोलताना म्हणाले की, प्रत्येक माणसाला साहित्यिक, सांस्कृतिक भूक असते, आणि ती भूक भागवण्याचे काम पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने होत आहे, त्यामुळें नवीन लिहिणाऱ्यांनी, साहित्याची आवड असणाऱ्यांनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे.
पाथर्डी तालुका शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे यांनी गेल्या तीन वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन अहवाल सादर केला.
‘ पुढील आठवड्यात नवीन कार्यकारणी तयार करण्यात येणार असून यामध्ये नव्या जुन्यांचा संगम करण्यात येईल, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे त्यावेळी उपस्थित असतील, असे शाहिर भारत गाडेकर यांनी सांगितले. यावेळी हाजी हूमायून आतार,शशिकांत गायकवाड, डॉ. राजकुमार घुले, महादेव कौसे, भाऊसाहेब गोरे, चंद्रकांत उदागे,राजेंद्र उदारे यांच्यासह तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. हुमायून आतार, डॉ अनिल पानखडे यांनी मनोगत व्यक्त केले.
शेवटी चंद्रकांत उदागे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here