Home महाराष्ट्र म्हसवड मध्ये सिद्धनाथ यात्रेचा उत्साह ; गुलाल खोबऱ्याची उधळण, लाखो भाविकांची उपस्थिती

म्हसवड मध्ये सिद्धनाथ यात्रेचा उत्साह ; गुलाल खोबऱ्याची उधळण, लाखो भाविकांची उपस्थिती

100

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड / सातारा :’श्री सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत सुमारे सात लाखाहून अधिक विक्रमी संख्येच्या भाविकांच्या उपस्थिती येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याची सांगता आज दुपारी वधू-वराची रथातून मिरवणूक काढून करण्यात आली यावेळी प्रचंड जयघोशात सिद्धनाथाच्या जयघोषने परिसर दुमदूमला अक्षरशः म्हसवड नगरी गुलालमय झाली.
कार्तिक शुध्द प्रतिपदा दीपावली पाडवा ते मार्गशिर्ष प्रतिपदा, देव दीपावली असा एक महिन्याच्या कालावधीत विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमाने श्रीचा शाही विवाह सोहळा संपन्न होत असतो. या विवाह सोहळ्याची सांगता श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी या वधू – वराच्या उत्सवमूर्तींची चारचाकी रथातून मिरवणूक काढून करण्यात येत असते. येथील रिंगावन पेठ मैदानात व त्या नजिकच्या माण नदीच्या कोरड्या पात्रातील वाळवंटात यात्रा भरली जाते परंतु या वर्षी नंदी पात्रातील बांधऱ्यात पाणी साठपा असल्याने पारपंरीक मार्गने मिरवणूक नं जाता त्यात बदल होऊन ती नगरपरिषद, एस. टी, स्टँड मार्गे पुढे गेली.
श्रींचा शाही विवाह सोहळ्यानिमित्त येथील श्रीच्या मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची दर्शन रांग लागली होती. ही रांग दर्शनबारी पूर्णत: भरुन मंदिराच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर भाविक रांगेत उभे होते. यात्रेस आलेल्या भाविकांमुळे मंदीर परिसरासह शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. काल रात्री गावोगावच्या मुक्कामी राहिलेल्या मानाच्या काठ्या व सासने वाजंत्रीसमवेत संबंधित भाविकांनी श्रीच्या रथास भेट दिल्या.
आज दुपारी दीडच्या सुमारास येथील राजवाड्यातून रथाचे मानकरी समवेत मिरवणुकीने श्रीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाले. रथ मिरवणुकीच्या सोहळ्यानिमित्त मंदिराचे सालकरी यांच्या निवासस्थानी स्थापन्न करण्यात आलेल्या श्री सिध्दनाथ व देवी जोगेश्वरीच्या उत्सवमूर्तीची प्रथम पूजा व नंतर आरती करण्यात आली. यावेळी रथाचे मानकरी राजेमाने कुटुंबातील सर्व सदस्य,आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थिती दर्शवीली
*बंधारा आणि नगरपालिका प्रशासनामुळे भाविकात प्रचंड नाराजी*
म्हसवड मधील माणगांगा नदीपात्रावर बांधरा असून या बांधऱ्या मुळे आज रथ मार्ग बदलला गेला आणि पूर्वापार चालत आलेली परंपरा पुन्हा एकदा खंडित झाली यामुले भाविकात प्रचंड नाराजी पाहायला मिळाली आणि व्यापारी वर्गाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी काही भाविकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले म्हसवड नगरपालिका 1857 ची असून सुद्धा आजची यात्रा सोयीसुविधा युक्त देऊ शकली नाही यांची खंत भाविकांनी व्यक्त केली हे नगरपालिका प्रशानाचे अपयशच असल्याचे निदर्शनास आले यापूढे प्रशासक असो अथवा शासक यात्रेचे नियोजन हे चोख असावे असे भाविकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here