Home चंद्रपूर सेवानिवृत्त शिक्षक धर्मदास पानसे यांना शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिला निरोप

सेवानिवृत्त शिक्षक धर्मदास पानसे यांना शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिला निरोप

81

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.1डिसेंबर):- अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकाचं आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती. शांत व सुस्वभावी असा मनमिळाऊ स्वभाव असलेले चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयचे शिक्षक धर्मदास पानसे 28 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झाले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना निरोप दिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिमूर येथे धर्मदास पानसे यांनी 1996 पासून मुक बधीर विद्यार्थ्यांना शिक्षण सेवा सुरू केली. 30 नोव्हेंबरला त्यांचे वय 58 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त मुक बधीर विद्यालयच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी, कर्मचारी यांचे वतीने त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष शैलेश कापसे तर प्रमुख अतिथी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष श्रीहरी सातपुते, मुख्याध्यापक रामदास कामडी, सत्कारमूर्ती धर्मदास पानसे व मंगला पानसे मंचावर उपस्थित होत्या.

मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी प्रास्ताविकातून धर्मदास पानसे यांच्या शालेय जीवनकार्यावर प्रकाश टाकला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक धर्मदास पानसे व मंगला पानसे यांचा शाल, श्रीफळ व चाळीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना महाकाळकर व आभार प्रदर्शन रामदास कामडी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ताराचंद बोरकुटे, पटवारी कोहपरे, अशोक विभुते, दिलीप उरकुडे, दिलीप चौधरी, राजू बनसोड, भूपेंद्र गरमडे, विनायक हजारे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here