▪️डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चा पत्रकाद्वारे इशारा
✒️सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सातारा(दि.1डिसेंबर):-सध्या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावात सहकारी बँक, पतसंस्था तसेच फायनान्स यांचेकडून गोरगरीब कर्ज दा्रांकडून शासनाचे नियम डावलून दहशत माजवून कर्जाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी होत आहे. ही पद्धत चुकीची असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. यापुढे अशा पद्धतीच्या घटना घडल्यास आणि नियमबाह्य कर्जाची वसुली करताना बँका पतसंस्था किंवा फायनान्स निदर्शनास आल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात दिलेली माहिती अशी, दलित पद दलित वंचित आणि गरीब गरजू लोकांनी आपल्या उदरनिर्वासाठी करीत असलेले व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी किंवा कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय उद्योग उभे करण्याच्या उद्देशाने सहकारी बँका, पतसंस्था किंवा फायनान्स कडून कर्ज घेतले असल्याचे नाकारता येतं नाही. काही लोकांनी अशी कर्ज घेऊन ती वेळेवर परतफेड केलेली आहेत व प्रयत्नही करत आहे. काहींचे व्यवसाय योग्यरित्या न चालल्यामुळे बँकेचे हप्ते किंवा पतसंस्थेचे हप्ते वेळेवर गेले नसल्याचेही नाकारता येत नाही. परंतु त्यामुळे त्यांच्या घरावरती जप्ती आणण्याची भीती दाखवणे, घरातील भांडी किंवा वस्तू वगैरे भरून घेऊन जाईल अशा पद्धतीची भीती दाखवणे, वसूल करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचे धमकी देणे हे करणे कायद्यामध्ये बसत नाही. हे अधिकारी कर्मचारी सर्वसामान्यांना भेटीस धरून दहशत माजवून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बँका,पतसंस्था किंवा फायनान्स यांच्या दहशत माजवून कर्ज वसुली करण्याच्या प्रक्रियेमुळे काही कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडू शकते, अशी पीडित कुटुंबे दहशतीखाली राहू शकतात. त्यामुळे अशा दहशत माजवून कर्ज वसुलीचा प्रयत्न बँकेचे पदाधिकारी, बँकेचे अधिकारी,पतसंस्थांचे अधिकारी पदाधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी योग्य ते प्रशिक्षण द्यावे किंवा सल्ले द्यावे. अन्यथा चुकीच्या पद्धतीने कर्जाची वसुली करणाऱ्या बँकांच्या, पत संस्थेच्या आणि फायनान्स च्या विरोधात आंदोलने करावी लागतील असा इशाराही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिला आहे.
लवकरच नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना भेटणार -विश्वास मोहिते सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आता नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री होतील . त्यांना भेटून हा विषय मार्गी लावण्या संदर्भात निवेदन देणार आहोत. याबाबत केंद्रीय स्तरावरती आणि महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये लवकरच चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत.