✒️भंडारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
भंडारा(दि.1नोव्हेंबर):-मुख्यमंत्री पद जवळपास निश्चित झाले आहे.२८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत महायुतीचे २३४ आमदार निवडून आले आहेत. मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ४३ इतकी आहे.महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे.विधानसभेची १३२ जागा जिंकल्या आहेत.सर्वाधिक मंत्रिपद त्यांच्या वाट्याला जाणार .विधानसभेतील आमदाराची संख्या पाहता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या वाट्याला १० मंत्रिपद मिळू शकतात. राजकीय पक्ष त्यांच्या वाट्याला आलेले मंत्रिपद एकाच टप्प्यात भरत नाही.
मागील मंत्रीमंडळात १५ मंत्रीपद रिक्त होती. भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू कारेमोरे. भंडारा विधानसभा क्षेत्रातून शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर आणि साकोली विधानसभा क्षेत्रातून नाना पटोले(काँग्रेस) विजयी झाले आहेत.
भंडारा – गोंदिया लोकसभेत सात विधानसभा क्षेत्र असून विनोद अग्रवाल (गोंदिया) ,विजय रहांगडाले (तिरोडा), राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव)राष्ट्रवादी अजित पवार गट ,संजय पुराम (आमगाव) भारतीय जनता पार्टी निवडून आलेले आहेत आमदारांची संख्या,वाट्याला येणारे मंत्रीपद पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात यावर अवलंबून असेल .मंत्र्यांची संख्या ,त्यांचे खातेवाटपावरून सहमती झाल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तीनदा विधानसभेसाठी निवडून गेलेले भंडारा चे आमदार यांची नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार काय याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.