▪️दलित- आदिवासी ओबीसी-बारा बलुतेदार अल्पसंख्याक समाजाची मागणी
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.30नोव्हेंबर):- मोर्शी – वरूड विधानसभा मतदार संघातून बहुजन समाज नेते उमेश उर्फ चंदू यावलकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांना निवडून आणण्यात दलित- आदिवासी-भटक्या विमुक्त ओबीसी- बारा बलुतेदार, आल्पसंख्याक सह इतरही सर्व जाती-जमातींनी भरभरून सहकार्य केले. त्यांचा हा विजय केवळ एका माळी समाजाचा विजय नसून तो मतदार संघातील सर्वच जाती जमातींचा विजय आहे. चंदुभाऊ यावलकर यांचे सर्व जाती-धर्म-पंथ व राजकीय पक्षातील व्यक्तीसोबत स्नेहपुर्ण व सलोख्याचे संबंध आहेत. त्यांना केवळ मतदार संघातीलच नाही तर विदर्भातील सर्वसामान्यांच्या तसेच शेतक-यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून संधी दिल्यास केवळ माळी समाजालाच नव्हे तर विदर्भातील विविध वंचित व उपेक्षित समाज घटकांना न्याय मिळणार आहे.
उमेश उर्फ चंदू यावलकर यांना मंत्रीमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळावे अशी मागणी उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र आंडे, युवा उद्योजक नितीन खेरडे, महात्मा फुले बँकेचे माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र आंडे, माजी नगराध्यक्ष श्री. प्रशांत सावरकर, सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंधचे श्री. ओमप्रकाश अंबाडकर, इंजि. भरतराव खासबागे, महात्मा फुले चॅरीटेबल ट्रस्टचे प्रदीप लांडे, प्राचार्य निळकंठ बोरोडे, मरार माळी विकास संस्थाचे श्री रामलाल खैरे, समाजभूषण संघाचे इंजि. सुधाकर विरुळकर, शालीनी मांडवधरे, त्रिरत्न संघाच्या अलका गंभीर, स्व. अण्णाभाऊ साठे क्रांती
परिषदेचे ईश्वरदास गायकवाड, कै . मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले, धनगर समाज नेते सुभाष गोहत्रे, मातंग समाज नेते उत्तमराव भैसने, मुस्लीम धर्मगुरु प्राचार्य रिजवी, शेख अनिस, महात्मा फुले समता परीषदेचे अॅड. बाबुराव बेलसरे, सहकार नेते अशोक दहीकर, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे, खाटीक समाज नेते प्रकाश खंडारे, लहुजी वस्ताद संघाचे युवा नेते सुभाष शिंदे, सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्या स्मिता संजय घाटोळ, डॉ. उज्ज्वला मेहरे, सौ. रजनी आमले, महात्मा फुले सत्यशोधक समितीचे अध्यक्ष विनोद इंगळे, आंबेडकरी विचारवंत धम्मपाल रामटेके, विदर्भ कलाल सेवा संचाचे लक्ष्मीनारायण जयस्वाल, महानुभाव संप्रदायाचे श्री. मनिष देशमुख, आदिवासी समाज संघटनेचे श्री. कमलाकर घोंगडे, किसान नेते शंकरराव आचरकाटे, अभियंता संघटनेचे इंजि. अशोक टेंभरे, बारा बलुतेदार संघाचे प्रदीप पाचघरे, ब्राम्हण विचारवंत प्राचार्य आमले, नरहरी माळवी संघाचे इंजि. ज्ञानेश्वर कुर्वे, मुलनिवासी संघाचे महेंद्र भातकुले, माजी सरपंच सी. संगीता पाचघरे, फुले – शाहु -आंबेडकर पुरोगामी संघटनेचे माणिक लोखंडे, प्राचार्य दहीवडे, डी. खोब्रागडे, भीमराव मेश्राम आदी दलित आदिवासी, भटके , विमुक्त, ओबीसी बारा बलुतेदार अल्पसंख्यांक समाज संघटनेच्या पदाधिकान्यांनी मागणी केली.