Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

31

▪️माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन

✒️सोलापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सोलापूर(दि. 30नोव्हेंबर):-प्रेस संपादक व पत्रकार संघ, सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे वतीने जिल्हा परिषद शाळा देशमुखपट्टा माळशिरस येथे खाऊचे वाटप करून पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने शूटिंग बॉल महाराष्ट्र संघाचे सलग सात वर्ष कॅप्टन असलेले अमिर काझी व जन कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खंडागळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने अमिर काझी संतोष खंडागळे, सोमनाथ खंडागळे, शशिकांत कडबाने यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ तांबोळी, सुवर्णा घोरपडे, विष्णू भोगळे, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे गणेश फुगे उपस्थित होते. मुख्याध्यापिका नूरजहाँ तांबोळी यांनी आभार मानले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पी जी कोटूरवार, सचिन जाधव, पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा महिला अध्यक्षा व तालुका पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here