Home अमरावती महात्मा फुले एक थोर समाजक्रांतिकारक -प्रा.अरुण बुंदेले

महात्मा फुले एक थोर समाजक्रांतिकारक -प्रा.अरुण बुंदेले

43

▪️महात्मा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विविध संघटना व फुले – शाहू – आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.30नोव्हेंबर):-समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांनी केलेले सामाजिक परिवर्तन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यावरून स्पष्ट होते.ज्या काळात स्त्री व शुद्रांना परंपरेने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या काळात म. फुलेंनी सन १८४८ ते १८५१ या चार वर्षात स्त्री शुद्रांसाठी १८ शाळा काढल्या व योग्य असा अभ्यासक्रमही तयार केला.रुढी परंपरेतून समाजाला मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बालविधवा, केशवपन, बालविवाह, विजोड विवाह, बालहत्या, बहुपत्नी या दुष्ट रुढी परंपरांचा त्यांनी कडाडून विरोध केला . त्यांच्या ‘ब्राम्हणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक व ‘अखंडादि काव्यरचना’ या ग्रंथांनी बहुजन समाजात क्रांती घडवून आणली. महात्मा फुले एक थोर समाजक्रांतिकारक होते. “असे विचार समाजप्रबोधनकर्ते व अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

ते सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या 134 व्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.दि.28 नोव्हेंबर 2024 ला क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ), प्रमुख वक्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान), प्रमुख अतिथी महात्मा फुले समता परिषदेचे डॉ.गणेश खारकर, मरार माळी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष श्री रामकुमार खैरे, किसान नेते श्री शंकरराव आचरकाटे, प्राचार्य व्ही.आर. बनसोड इंजि. वासुदेव चौधरी, सहकार नेते श्री अशोक दहीकर ,माजी सभापती श्री मिलिंद तायडे, वंचित बहुजन आघाडीचे श्री सिद्धार्थ भोजने,श्री बाबाराव गायकवाड, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार ॲड. प्रभाकर वानखडे, आनंदराव इंगळे रमेश आठवले, मनोज चौधरी,संदीप भगत, अनिल मोहोळ,अजय तायडे, शुभम थोरात,पंकज खवले, पंजाबराव खवले ,सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंधचे श्री गोविंद फसाटे तसेच सकल माळी व ओबीसी समाज, म.फुले उत्सव व सौंदरीकरण समिती, अलुतेदार, बलुतेदार विमुक्त भटक्या जाती, जमाती समाजातील कार्यकर्ते ,प्रा. प्रदीप शेवतकर ,ओमप्रकाश अंबाडकर, सुहास गोंगे, प्रकाश लोखंडे, वी. दा. पवार, गणेश मानकर, अशोक दहिकर, विजय धाकूलकर, अजय राऊत,शरद वर्कर अशोक कवटकर संजय गावडे,रुपेश फसाटे, किरण मेहरे, डी. एस. पवार, शांतारामजी होले,विनायक देशमुख, सौ. संगीता मायखेडे,ॲड.नागरीकर, संदीप राऊत,नंदकिशोर गारुडी, राजाभाऊ हाडोळे, प्रवीण मेहरे, निलेश नागपुरे,जयश्री कुबडे, अरुणा चौधरी, भारती गुहे, निलिमा भटकर, पद्मा खेडकर, वैशाली धाकुलकर, दीपक मेहरे, शरद वडेकर, विनोद कुहेकर, प्रदीप लांडे, डी. एस. यावतकर, सुरेश मेहरे,नारायण सांडे, ज्योती सांडे, bज्योती सांडे,गणेश मानकर पंजाब खवले ,नरेंद्र कविटकर विनोद बोबडे ,प्रवीण मेहेरे, नंदकिशोर गारूडी ,शेखर माळोदे, विजय ठाकूर, ॲड. नागरिककर, विनायकराव देशमुख, अशोकराव दहिकर ,प्रियंका मुनधरे, दीपक मेहरे,दामोदर पवार, अजय राऊत,डॉ.नीलिमा उमप, प्राचार्य दत्तात्रय गणगणे तथा नव जागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावतीचे गणेश मुंधरे, सतीश ढोरे,विक्रांत सातारकर, रुपेश वानखडे तेजस्विनी सोनार, धनंजय देशमुख ,राहुल खोडके, आकाश माहोरे,सागर जांभुळकर, रूपाली पाटील, निलुदास, गुंजनदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्वप्रथम महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले याचा स्मृतिदिन समता दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” जोतीराव फुले “या स्वराचित अभंगाचे सुमधुर स्वरात गायन करून सर्वांना मंत्र मुग्ध केले.

——–

*महात्मा फुलेंचा लढा हा सकल मानवजातीच्या उत्थानासाठी होता- प्रा.श्रीकृष्ण बनसोड*

 

अध्यक्षीय भाषणात समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ” महात्मा फुलेंचा लढा हा सकल जाती जमातीतील वंचित समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी होता. पुरुषप्रधान मनुवादी संस्कृतीत महिलांवर होणाऱ्या अन्याया – अत्याचाराविरुद्ध होता .
सकल मानव जातीच्या उद्धारासाठी होता. असे विचार व्यक्त केले .

——–

*महात्मा फुले यांनी विषमतेविरुद्ध लढा दिला-वासुदेव चौधरी*

प्रमुख अतिथी मा.वासुदेव चौधरी यांनी ,” महात्मा जोतीराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. हा समाज समाजातील शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करत होता. त्यांना शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी म.फुले यांनी प्रयत्न केले. जातीय भेदभाव आणि स्त्री – पुरुष असमानतेविरुद्ध व सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी सामाजिक चळवळींना प्रेरणा दिली. असे विचार व्यक्त केले.

———-

*महात्मा फुले स्त्रीमुक्तीचे अग्रदूत -ॲड.प्रभाकर वानखडे*

 

प्रमुख अतिथी ऍडव्होकेट प्रभाकर वानखडे यांनी, “क्रांतीसुर्य महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाचे व बालहत्या प्रतिबंधकगृहाचे संस्थापक होते. कृतीशील समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर् होते . त्यांना सामाजिक परिवर्तन हवे होते म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांती केली .महात्मा फुले स्त्री मुक्तीचे अग्रदूत होत . सत्यधर्माची लक्षणे सांगताना म. फुले यांनी पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ, त्यागी, निष्ठावान, अहिंसक आहे असे पुरोगामी विचार मांडले.” असे विचार व्यक्त केले .याप्रसंगी गणेश मुंधरे, आकाश माहोरे , तेजस्विनी सोनार, प्रा.किसन बनसोड , धनंजय देशमुख, प्राचार्य दत्तात्रय गणगणे यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन ॲड. प्रभाकर वानखडे तर आभार मधुकरराव आखरे यांनी मांनले.
या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी व फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील अनेक समता सैनिक हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here