✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातारा(दि. 29नोव्हेंबर):-केंद्रीय प्रदूषण विकास महामंडळाने दिलेल्या निर्णयानुसार पीओपी पासून मूर्ती बनवण्यास बंदी असताना सातारा जिल्ह्या मध्ये राजरोसपणे पीओपीच्या गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत. या संदर्भात याचिका करते मारुती कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील मूर्ती कला प्रेमी ,कुंभार समाज व श्री संत शिरोमणी गोरोबाकाका माती कला संस्था सातारा ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ही काळाची गरज असून केंद्राने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत असून या संदर्भात प्रशासनाने कठोर कारवाई करून गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरकच बनवल्या पाहिजेत अशी सक्तीचे आदेश प्रशासनाने काढले पाहिजेत.
प्रशासनाची कुठलीही ठोस भूमिका नसल्यामुळे कुंभार समाजावर ऐनवेळी उपासमारीची वेळ येते आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने कुंभार समाज मूर्ती काम करत असतो. ची मूर्ती बनवणे हे कला व कौशल्याचे काम असल्यामुळे व त्याला अधिक वेळ लागत असल्याने या समाजातील कारागीर वर्षभरापासून तयारीला लागलेली असतात परंतु ऐनवेळी शासनाच्या उदासीनतेचा परिणाम असा दिसून येतील की ऐनवेळी पीओपीच्या मुर्त्या बाजारात येऊन वर्षभर का बर कष्ट करून मातीच्या मूर्तींना योग्य भाव मिळत नसल्यामुळे कुंभार समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळत झालेली आहे.
त्यामुळे प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात या संदर्भात निर्णय घेऊन पीओपीच्या मूर्तींना पूर्णता बंदी असल्याची जाहीर करून ज्या कोणी पीओपी गणेश मूर्ती बनवत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून मुंबईसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने माती कला मूर्तिकारांना मोफत शाडूची माती व त्या विक्री करण्यासाठी मोफत गाळे यांची सोय करण्यात येते त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या मूर्तीकरांना शाडूची माती मोफत व मूर्ती विक्री करण्यासाठी संबंधितांच्या ग्रामपंचायतीच्या अधिकारातील जागा मोफत देण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. कुंभार समाजाची याचिका करते मारुती कुंभार ,महेश कुंभार समाधान कुंभार ,सचिन कुंभार, अशोक कुंभार संभाजी कुंभार व शेकडो सदस्य यावेळी हजर होते.