*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड /सातारा -:
अग्रणी सोशल फौंडेशन,विटा यांच्या वतीने सत्यशोधक महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा माध्यमिक प्रशाला सुलतानगादे येथे संपन्न झाला. सदर पुरस्कार माध्यमिक प्रशाला सुलतानगादेचे मुख्याध्यापक आर.बी.घाडगे सर व धावडवाडी हायस्कूलचे क्रिडा शिक्षक ए.बी.शेख सर यांना प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात एस.एम.कॉलेजचे प्रा.जे.जी.मुलाणी सर प्रमुख मार्गदर्शक तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनराव अण्णा हसबे होते.तर साहित्यिक गझलकार मन्सूर जमादार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.तसेच संविधान प्रास्ताविका वाचन, व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा व महिला हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संघटक सागर माने यांनी तर उपक्रमाचा उद्देश संघटक हजरतअली सोनीकर यांनी केले.
सुलतानगादे ता.खानापूर येथे सत्यशोधक शिक्षण प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुलाणी सर म्हणाले की मनुष्याच्या जीवनात विकास व प्रगती साधायची असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचे आहे.आजच्या तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात फक्त पुस्तकी शिक्षण उपयोगी नाही, त्याबरोबरच तंत्र व कलाकौशल्य संपादन करणे आवश्यक आहे.तर यावेळी सत्कारमूर्ती आर.बी.घाडगे व बाबू शेख सर यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले.प्र.पाहुणे
साहित्यिक मन्सूर जमादार, संचालक गणेश धेंडे यांनी विचार मांडले. अध्यक्षीय मनोगत ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनराव अण्णा हसबे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब देशमुख सर व आभारप्रदर्शन सुतार सर यांनी केले.या कार्यक्रमास संस्थापक आप्पासाहेब माने, सुर्याजी पाटील,रिटा माने,निहाल शेख, सुहासिनी शिंदे, झेंडे सर,भुरके सर,अग्रणी संस्थेचे सचिव मुनीर शिकलगार व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी आदि उपस्थित होते.