✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.28नोव्हेंबर):- शहरातील मोठा माळीवाडा व लहान माळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव शहरात आधुनिक भारताचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ, विचारवंत, लेखक, स्त्री शिक्षणाचे आद्यजनक, क्रांतीसुर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
लहान माळीवाडा पाटील समाज मढी व माळी समाज मढी येथे संत तुकाराम महाराज व संत सावता महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम बैलगाडीवर राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित शहरातील, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी तात्यासाहेबांचे प्रतिमाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. तेथून गबानंद चौक, लहान माळीवाडा ,कोट बाजार व धरणी चौक येथे महात्मा फुले स्मारकाला अभिवादन करण्यात आले यानंतर धरणी चौकातून पुढे बाजोट चौक, महात्मा फुले चौक व सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा समाज मढी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
समारंभाप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे अहिल्यानगर येथे होणारे राज्य अधिवेशना संदर्भात जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सर्वांना माहिती देऊन अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन करून निमंत्रण पत्रिका वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, निंबाजी महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, विलास महाजन, संजय महाजन, भागवत चौधरी, भानुदास विसावे, पत्रकार धर्मराज मोरे, कडू महाजन, राजेंद्र महाजन, हेमंत माळी, कैलास माळी, व्ही टी माळी, गोरख देशमुख, पप्पू भावे, लक्ष्मणराव पाटील , आनंद पाटील, राजेंद्र महाजन, एस डब्ल्यू पाटील,नरेंद्र महाजन,धीरज महाजन, दीपक महाजन, पी डी पाटील,नितेश महाजन या सोबतच सर्व बहुजन समाजातील सर्व समाजाध्यक्ष, पंचमंडळ व सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.