✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
साकोली(दि.28नोव्हेंबर):-येथील युवा मित्र मंडळ वतीने आज शुक्रवार २९ नोव्हें. ला खास मंडईचे आयोजन करण्यात आले आहे. आणि रात्री स्व. त्र्यंबक पाटील बुध्दे स्मृती प्रतिष्ठान निर्मित, रंगकर्मी रंगभूमी वडसाचे “घायाळ मी हरिणी” हा नाट्यप्रयोग सादर होणार असून या महोत्सवाला जास्तीत जास्त जनतेने आस्वाद घ्यावा असे आवाहन कार्यकारिणी मंडळ आयोजकांनी केले आहे.
युवा मित्र मंडळ साकोली, शंकरपट समिती साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज ता. २९ ला दू. १ पासून मुख्य शहरातील श्रीराम भक्त हनुमान मंदिर परिसर तलाव वार्ड येथे भव्य दंडार संस्कृती चमुंचे स्पर्धा सादरीकरण होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता लाखांदूर रोडवरील मैदानात “घायाळ मी हरिणी” हा नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. याला उदघाटक आमदार नाना पटोले, अतिथी वैनगंगा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, माजी आमदार बाळा काशिवार, मंच अध्यक्ष जिपस अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, डॉ. नेपाल रंगारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर मंडई महोत्सवात जास्तीत जास्त लोककला झाडीपट्टी दंडार संस्कृती चमुंनी सहभागी व्हावे व जनतेनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा युवा मित्र मंडळ अध्यक्ष इंजि. सपन कापगते, उपाध्यक्ष सुरेश बघेल, प्रभाकर सपाटे, सचिव हेमंत भारद्वाज, सहसचिव बालु निंबेकर, कोषाध्यक्ष मोहन लंजे, सतिश लांजेवार, मंच व्यवस्थापक गोलु गहाणे, शुभम पुस्तोडे, सुशिल पुस्तोडे, संजय निंबेकर, हितेश उईके, सुरज पुस्तोडे, दक्षता समितीचे दिलीप झोडे, ईश्वर कापगते, अमोल पुस्तोडे ,निलेश गहाणे, देवा लांजेवार, नरेश लांजेवार, अनिल गहाणे, योगराज लांजेवार व युवा मित्र मंडळ साकोली यांनी केले आहे.