Home महाराष्ट्र रेल्वे खाली केली शिक्षकासह पत्नी व मुलीची आत्महत्या

रेल्वे खाली केली शिक्षकासह पत्नी व मुलीची आत्महत्या

929

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.28नोव्हेंबर):- गंगाखेड येथील ममता कन्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेल्या शिक्षकांनी पत्नी व मुली सह गंगाखेड रेल्वे स्टेशन पासून जवळच परभणी कडे जाणाऱ्या लोहमार्गावर गोदावरी नदी पुलाच्या पुढे मालवाहतूक रेल्वे समोर रेल्वे रूळवार डोक ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,पोलीस निरीक्षक दिलीप कुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर,डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख जमादार दिपक व्हावळे,गौस खॉ पठाण, पोलीस शिपाई जगन्नाथ शिंदे,परसराम परचेवाड,शेख कलंदर, शिवाजी बोमशेटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तिघाचे मृत देह शवविच्छेदना साठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंतसुरु होती.

या घटनेत मयत झालेल्या शिक्षकाचे नाव मसनाजी सुभाष तुडमे वय वर्षे 45, त्यांची पत्नी रंजना मसनाजी तुडमे वय वर्षे 40, व मुलगी अंजली मसनाजी तुडमे वय वर्षे 21 सर्व राहणार किनी कट्टू तालुका अहमदपूर हल्ली मुक्काम बळीराजा कॉलनी गंगाखेड विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील पती-पत्नी व मुलगी या ठिकाणी एकाच विचारणे एकाच रेल्वे रुळावर डोके ठेवून आजूबाजूला एका ओळींना झोपून आत्महत्या केलेल्या घटनेने या कुंटूंबावर कोणते संकट कोसळले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here