▪️संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित; प्रा.आकाश बिवाल
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगाव(दि.27नोव्हेंबर):-येथील संविधान प्रेमी संघटनेच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शपथ घेत उद्देशिकेचे सामुहिक वाचन गोरख देशमुख यांच्या सोबत संविधान प्रेमींनी केले. झाल्यानंतर मुंबई येथील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पी डी पाटील यांनी आदरांजली अर्पण केली. यानंतर प्रा. आकाश बिवाल यांनी आपल्या मनोगतातून भाष्य केले की, भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून प्रामुख्याने लोकशाहीचा आत्मा आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मुल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, भारताचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची सर्वांना माहिती व्हावी.
यादृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आला आहे. तसेच कायदा हा संविधानावर चालत आहे. संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहे. त्यामुळे आपण भारतीय नागरिक म्हणून संविधानातील मूल्य व तत्वांचे जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कटिबध्द राहणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले. संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित असल्याचे प्रतिपादन प्रा.आकाश बिवाल यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना (उबाठा) चे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग मराठे, हेमंत माळी सर, गोरख देशमुख, राजेंद्र वाघ, पी डी पाटील, लक्ष्मण पाटील, सुरज वाघरे, किशोर पवार, संतोष सोनवणे, ललित मराठे, अमोल सोनार, विशाल सोनार, भूषण भागवत, अविनाश करोसिया, मोहित भाटिया, इम्रान शेख, सिद्धार्थ वाघरे, सुजित वाघरे, मोहित भाटिया, मयूर भामरे, आकाश पवार, पवन चौधरी, प्रथमेश चौधरी, अजय सोनवणे, अविनाश चौधरी, निलय केदार, जिनेश पचेरवार, बंटी चौधरी, नयन वाघरे, करणभाऊ, उल्केश धर्माधिकारी आदींनी संविधानाची शपथ घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांतून लिहिलेल्या संविधान वाचविण्याची जतन करण्याची शपथ घेतली.