Home महाराष्ट्र जिल्हा हिवताप कार्यालयास पुर्ण वेळ अधिकारी द्या – कास्ट्राईब ची मागणी

जिल्हा हिवताप कार्यालयास पुर्ण वेळ अधिकारी द्या – कास्ट्राईब ची मागणी

132

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड /सातारा : सातारा जिल्हा हिवताप अधिकारी सातारा अतिरिक्त पदभार असणारे डॉ . राजेद्र जाधव १ २ महिन्या मध्ये एकदा ही कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता पंचायत समिती सातारा मधुनच कारभार हाकत आहेत . त्याचा परिणाम म्हणजे सध्या कार्यालयात कोणा वरच कोणाचे नियंत्रण राहीले नाही . जिल्हा हिवताप कार्यालयात साधारण ३०० च्या वर कर्मच्याऱ्यांची आस्थापना आहे . म्हणून या ठिकाणी अनुभवी व प्रशासनात हात खंडा असणारा अधिकारी पुर्ण वेळ द्यावा . अशी मागणी कास्ट्राईब च्या वतीने सहसंचालक पुणे व उपसंचालक पुणे यांना एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे . निवेदनात पुढे म्हटले आहे की , डॉ . राजेंद्र जाधव यांना पदभार देताना बेकायदेशीर रित्या दिला आहे . जिल्हा हिवताप अधिकारी या पदाचा पदभार देताना सहसंचालक यांचे आदेशाने सदरचा पदभार देणे बंधनकारक असताना, डॉ . जाधव यांना हिवताप अधिकारी पदाचा पदभार देताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी तसेच डॉ राधाकिशन पवार यांचे हस्तक्षेपामुळे डॉ . खलिपे यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत नसताना सदरचा पदभार डॉ . खलिपे यांनी दिला आहे , त्यानंतर कालांतराने तत्कालीन सहसंचालक ( हिवताप ) डॉ सारणीकर यांचे वर वरिष्ठ अधिकारी यांचे दबावामुळे डॉ राजेंद्र जाधव यांना पदभार दिलेला आहे – तो बेकायदेशीर बदल्या , प्रतिनियुक्त्या व पदोन्नत्या देण्यासाठी – असा ही आरोप सदर च्या निवेदनात केला आहे . तसेच डॉ . राजेंद्र जाधव यांचे कार्यकालात बोगस रजा प्रवास सवलतीचे लाभ दिलेले असुन चुकीचे बदली प्रस्ताव तयार करवून घेवून त्यास वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी ही दिलेल्या आहेत . डॉ राजेंद्र जाधव संपूर्ण कारभाराची चौकशी करून त्यांचे वर कारवाई करावी अशी मागणी प्रधान सचिव , आयुक्त आरोग्य सेवा व संचालक १ मुंबई यांचे कडे करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here