रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.27नोव्हेंबर):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिनाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, एन.एस.एस. विभाग तथा एन. सी.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष उपाते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मान. राजकुमार शेंडे उपस्थीत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देवेश कांबळे यांनी संविधान दिनाचे महत्व विषद करून भारतीय संविधानाची महत्ता, संविधान निर्मिती मधील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि संविधानिक लोकशाहीपुढील वर्तमानातील आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुभाष उपाते यांनी भारतीय संविधान देशाला एकसंध ठेवण्यात मोलाची भूमिका बजावते असे विधान केले. प्रमुख अतिथी मान. राजकुमार शेंडे यांनी देखिल आपले विचार मांडले.
याप्रंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रा. तुफान अवताडे यांनी मानले . या प्रसंगी महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेटस, प्राध्यापक, तथा कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.