Home महाराष्ट्र संविधानामुळे महिलांचा भविष्यकाळ समृद्ध व सुरक्षित : सौ. दीपाली निवास

संविधानामुळे महिलांचा भविष्यकाळ समृद्ध व सुरक्षित : सौ. दीपाली निवास

89

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.27नोव्हेंबर):-अग्रणी सोशल फौंडेशनच्या वतीने महिला हिंसाचारविरोधी पंधरवडा २६ नोव्हेंबर संविधान दिन ते १० डिसेंबर मानवाधिकार दिन या दिवसांच्या कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे.याचे शुभारंभ ग्रामपंचायत सभागृह,घरनिकी ता.आटपाडी येथे झाला.यावेळी भारतीय संविधान व महिला सुरक्षा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.त्याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून दिपाली आशा निवास यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की भारतीय संविधान अंमलात येण्याच्या पुर्वी देशात विषमतावादी व अन्यायी अशा मनुस्मृतीचा कायदा लागू होता.

त्यामुळे महिलांना शिक्षण व स्वातंत्र्य मिळत नव्हते, परंतु जेव्हापासून संविधानाची निर्मिती झाली,तेव्हा महिलांना स्वातंत्र्य,समता, सामाजिक , आर्थिक व राजकीय न्याय व सन्मान मिळत आहे, त्याबरोबरच भविष्यकाळात त्यांना समृद्ध व सुरक्षितता याच संविधानानुसार मिळणार असल्याने सर्व महिलांनी भारतीय संविधानाचे रक्षण प्राणपणाने करणे आवश्यक आहे. यावेळी चव्हाण मॅडम,सुषमा मोटे,सविता काकडे, सुहासिनी शिंदे,रिटा माने यांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला देवकर मॅडम व खैरमोडे मॅडम यांनी स्वागत गीत सादर केले.

मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी संयोजिका नंदाताई खैरमोडे यांनी प्रास्ताविक केले.यामध्ये त्यांनी अग्रणी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला हिंसाचारविरोधी अभियानाची संकल्पना व उपक्रमाची माहिती दिली.तर अक्षया माने यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन, प्रियांका तोरणे यांनी महिला हिंसाचारविरोधी शपथ तर निलम तोरणे यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.शेवटी आभारप्रदर्शन अनिता कचरे यांनी तर कार्यक्रमाचे‌ सुत्रसंचलन वर्षाताई माने यांनी केले. यावेळी अश्विनी तोरणे, सविता तोरणे,न्यु इंग्लिश स्कूल,घरनिकी येथील विद्यार्थींनी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.शेवटी सामुहिक राष्ट्रगीत गायन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here