✒️अनिल साळवे,(परभणी जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि. 27नोव्हेंबर):-महिलांच्या सबलीकरणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे म्हणून सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी केंद्र शासनाच्या सीएसआर फंड अंतर्गत पर्यावरण फाउंडेशन यांच्या सहाय्याने व श्री मुक्तेश्वर सेवाभावी संस्था गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने गंगाखेड शहरातील महिला स्वालंबी होऊन त्यांना रोजगार मिळावा यासाठी उत्कृष्ट उपक्रम राबवित आहे.
पर्यावरण फाउंडेशन व श्री मुक्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील महिलांना (दिनांक 26 नोव्हेंबर मंगळवार) रोजी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या योजनेमध्ये 18 ते 45 वयोगटातील महिलांना चार दिवसीय प्रशिक्षण देऊन 25% अनुदानावर सी एस आर फंड अंतर्गत गंगाखेड शहरात राबविण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण पूर्ण झालेल्या पहिल्या तुकडीच्या 20 महिलांना शहरातील सारडा कॉलनी येथील कार्यालयात शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच प्रशस्ती पत्राचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले पर्यावरण फाउंडेशनचे अतुल तुपकर, सोमेश्वर दामा, मुक्तेश्वर सेवाभावी संस्थेचे पवन शिंगोटे,शेख जीयाउलहक्क (जऊ) बेलदार, मोसिन पठाण, इरफान पठाण, प्रशिक्षक शेख नगमा जीयाउलहक्क (जऊ) बेलदार, गजानन गिरी,धोंडी शेटे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार महेमूद शेख यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री मुक्तेश्वर सेवाभावी संस्थेचे पवन शिंगोटे यांनी उपस्थित महिलांना योजनेचा लाभ कसा घेता येईल याप्रसंगी मार्गदर्शन केले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला या परभणी जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक असून, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येनार आहे, शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून महिलांनी शिलाई मशीनचा लाभ घेतलेला नसावा, या योजनेमध्ये महिलांना तीन दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड ,पासपोर्ट फोटो व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत नोंदणीसाठी आवश्यक आहे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 45 दिवसांनी शिलाई मशीन उपलब्ध होईल व त्यानंतरच महिलांना फक्त 3270 रुपये नाममात्र प्रशिक्षण शुल्क अदा करून मशीन हस्तगत करून घ्यावयाच्या आहेत.
या योजनेमध्ये महिन्यातून 100 महिलांना उत्कृष्ट महिला प्रशिक्षक यांच्यामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण एक दिवसाचे राहणार आहे त्यासाठी महिलांनी कोणालाही पैसे देऊ नये प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना मशीन उपलब्ध झाल्यानंतरच नमूद रक्कम भरणा करून मशीन हस्तगत केली जानार आहे सदरील योजनेच्या अधिक माहितीसाठी महिलांनी संस्थेचे पवन शिंगोटे मो. 8623823111, 7507874460, गजानन गिरी मो. 8888340633, शेख जियाउलहक्क (जऊ) बेलदार मो. 9604297865 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. सदरील कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती