✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.27नोव्हेंबर):- ज्ञानदीप प्रशाकीय महाविद्यालय चौगान येथील विध्यार्थी व जिल्हा परिषद प्राथ. शाळा मालडोंगरी येथील सर्व शिक्षक व प्राध्यापक मिळून आज संविधान जनजागृती करण्यासाठी प्रत्येक चौक मध्ये संविधानाचे महत्व रॅली व पथनाट्यद्वारे सादरीकरण च्या माध्यमातून लोकांना दाखविण्यात आले. आज संविधान टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
संविधानामुळे ज्या काही सुविधा जनसामाण्यांना मिळालेले आहे ती देण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. याच दिनाचे औचित्य साधून ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान तर्फे ग्राम पंचायत मालडोंगरी आणि जिल्हा परिषद प्राथ. शाळा मालडोंगरी यांना *भारतीय संविधान* चा फोटो भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रुपेशजी रमेश निहाटे, ग्रा. पं. मालडोंगरी येथील सरपंच ठाकरे ताई, मुख्याध्यापक पाल सर, जि. प. प्रा. शाळा मालडोंगरी, गहाणे मॅडम, रेहपाडे मॅडम, ठाकरे सर, पारधी मॅडम व ज्ञानदीप मधील कार्यकारी प्राचार्य प्रधान मॅडम, कांबळी मॅडम, मेश्राम मॅडम, तुंबडे मॅडम, दयाल सर, प्रधान सर, दिघोरे सर, बुराडे बाई, गावातील प्रतिष्टीत नागरिक रुपेश पिलारे, राहुल पारधी, संजय निहाटे, मयूर कऱ्हाडे, ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.