✒️उपक्षम रामटेके(सह संपादक)मो:-9890940507
चिमूर(दि.26नोव्हेंबर): -तालुक्यातील जांभुळघाट येथे जुनी परीवाराचे वतीने दर वर्षी प्रमाणे गुरु नानक देवजी चा ५५५ वा प्रकाश पर्व उत्साह साजरा करण्यात आला. या वेळी धन-धन गुरु नानक देव जी महाराज यांच्या शिकवण विषयी माहिती देण्यात आली.
शिख पंथाचे प्रथम गुरू नानक देव जी यांची जयंती हा प्रकाश पर्व म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, त्याचाच एक भाग म्हणून जांभूळघाट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जांभुळघाट येथील समूह सात संगत एकत्रीत आले होते.
यावेळे सुखमनी चा पाठ केल्यानंतर अरदास व गुरूनान देव जी महाराज यांच्या शिकवण व देव रूपी माहीती देण्यात आली. या वेळी स.गुरुदेवसिंग दुधानी (गडचिरोली), स.जीतसिंग जुनी (नागपुर), स.रतनसिंग अंध्रेले (वाहनगाव) यांनी मोलाची माहीती दिली. कार्यक्रमाचे आभार स. अदबसिंग जुनी यांनी मानले.कार्यकामाचा समारोप लंगरने ( महाप्रसाद ) करण्यात आला.