▪️जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे !.. – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ]
✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.26नोव्हेंबर):- सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४२ राज्यअधिवेशन ” राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी ” अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर, २०२४ रोजी नक्षत्र लॉन्स [ राजमाता अहिल्याबाई होळकर अधिवेशन नगरी ] बुरुडगाव रोड, अहिल्यानगर [ अहमदनगर ] येथे संपन्न होत आहे. जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले आहे.
४२ वे राज्यअधिवेशनाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. भूमिका सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार मांडणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून डॉ संजीवकुमार सोनवणे, डॉ.ज्ञानेश्वर गोरे, डॉ. प्रकाश हसनाळकर, डॉ. अशोक चोपडे, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ प्रल्हाद लुलेकर, डॉ. उमेश बगाडे, सतीश जामोदकर, डॉ. सुरेश झाल्टे, प्रतिमा परदेशी, विश्वासराव पाटील उपस्थित राहणार आहेत राहणार आहेत.
अतिथी व्याख्याते म्हणून सिने अभिनेते व दिग्दर्शक सत्यशोधक किरण माने उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते प्रा. सुभाष वारे, प्रा. अनंत राऊत, ॲड. संभाजी बोरुडे, डॉ. सुभाष वाघमारे, उत्तरेश्वर मोहोळकर, डॉ.प्रभाकर गायकवाड, धर्मकीर्ती महाराज, प्रा.डॉ.शेख एजाज, दादा महाराज पनवेलकर, प्रा. हंसराज जाधव, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. वंदना महाजन, कॉ. स्मिता पानसरे, सुनीता भोसले, जयश्री बागुल, अमीर हबीब, भारत पाटील, ज्ञानदेव राऊत, ॲड. मनीष थोरात उपस्थित राहणार आहेत शेती, शिक्षण, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, लोकशाही, कृषी संस्कृती, भारतीय परंपरा, महाराष्ट्रात सत्यशोधकांची भूमिका अशा विविध विषयांवर प्रबोधन व चर्चा होणार आहे.
या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष उत्तमराव पाटील असणार आहेत. सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव सुरेश झाल्टे, व अहिल्यानगर येथील सर्व शिवराय -फुले -शाहू -आंबेडकर विचारांचे पाईक तसेच सत्यशोधक सहकार्य करणार आहेत. या अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे अशी विनंती जळगाव जिल्ह्याचे सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, रवींद्र तितरे व जिल्हा समन्वयक विजय लुल्ह यांनी केले आहे.