Home महाराष्ट्र विधानसभा झाली आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रूपये कधी येणार?-‘लाडकी बहीण ठरली...

विधानसभा झाली आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रूपये कधी येणार?-‘लाडकी बहीण ठरली गेम चेंगर’..

161

✒️रुपेश वाळके(दापोरी प्रतिनिधी)

दापोरी(दि.26नोव्हेंबर):-राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद करण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार याची प्रतीक्षा महिलांना आहे. महिलांच्या शुभेच्छांमुळे महायुतीचं सरकार पुन्हा दणक्यात मोठ्या मताधिक्याने निवडून आलं आहे. आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर 2100 रूपये कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे.

एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. ज्या ज्या महिलांचे पैसे खात्यावर आले नाहीत, त्यांचे पैसे हे डिसेंबर महिन्यात जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरली. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा फायदा देखील महायुतीला झाल्याचं म्हणायला हरकत नाही. महायुतीला मोठ्या मताधिक्यांनी लाडक्या बहिणींनी पसंती दिली आहे.एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असंही सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतेही डिटेल्स समोर आले नाहीत. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार का? अशीही चर्चा लाडक्या बहिणींमध्ये रंगत आहे.

1500 रुपये मिळणार की 2100 रुपये?
डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली. यंदा मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली. तसंच, महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने महायुतीला फायदा झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न महिलावर्गाकडून विचारला जातोय. एवढंच नव्हे तर, पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून 2100 रुपये करणार का? आता नव्या हप्त्याचे पैसे मिळतांना जुन्या योजनेप्रमाणे 1500 रुपये देणार की वाढीव रकमेप्रमाणे 2100 रुपये देणार हाही प्रश्न विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here