✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि. 24नोव्हेंबर):- सर्वोदय शिक्षण समिती हिवरखेड,ता.मोर्शी व वऱ्हाड विकास अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांची १३४ वा पुण्यतिथी समारोह तसेच २३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन २६ व २७ नोव्हेंबर २०२४ रोजी महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,हिवरखेड, ता.मोर्शी येथे आयोजित करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाचा प्रारंभ मंगळवार २६ नोव्हेंबरला दु.३ वा.संविधान दिनी महात्मा फुलेंच्या समता ग्रंथदिंडीने करण्यात येईल ; तर २७ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन महात्मा फुलेंच्या गुलामगिरी ग्रंथाला शृंखलामुक्त करून व समतेची मशाल प्रज्वलित करून होणार आहे.
या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुरोगामी लेखिका डॉ. रजिया सुलताना राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या उद्घाटक आयएएस, सचिव जनसंपर्क विभाग, दिल्ली येथील मा.भाग्यश्री बानायत-डिवरे राहतील,स्वागताध्यक्ष प्रा. प्रफुल्लभाऊ भोजने,प्रमुख पाहुणे म्हणून हिवरखेडच्या सरपंचा सौ. सविता मालपे,माजी प्राचार्य रामराव वानखडे, शेतकरी नेते दिलीप भोयर, सर्वोदय शिक्षण समितीचे अध्यक्ष साहेबराव पाटील, उपसरपंच सचिन तायवाडे यांची उपस्थिती राहील.
संमेलनातीत कार्यक्रमाचा ओनामा भारतीय संविधानातील प्रस्ताविकाचे वाचन प्रा.नंदाताई थोरात (पर्यवेक्षिका) करणार आहेत तर अभंगकार प्रा.अरुण बुंदेले महात्मा फुलेंच्या अखंडाचे गायन करणार आहेत.साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक संस्थापक संयोजक सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड ( संपादक – वऱ्हाड विकास ) करणार आहेत;तर सूत्रसंचालन प्रा. सुभाष पारिसे, प्रमोद खसारे करणार आहेत.
—
*प्रबोधनपर परिसंवाद*
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ” बुद्ध,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या सत्यशोधकीय विचारांची वर्तमानातील अपरिहार्यता ” या विषयावर होणाऱ्या प्रबोधनपर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भाई अरविंदजी वानखडे असून प्रमुख वक्ते डॉ.उज्ज्वला मेहरे,प्रवीण चौधरी तर प्रमुख अतिथी गुणवंत वरघट (गटशिक्षणाधिकारी पं.स.,मोर्शी, डॉ. बी.एस.चंदनकर,बबनराव पाटील उपस्थित राहतील. या सत्राचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका संजया अ. टाक करणार आहेत.
——
*एकपात्री नाट्यप्रयोग*
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजता ‘मी सत्यशोधक जोतीराव फुले बोलतो ‘या एकपात्री नाटकाचे सादरीकरण सुप्रसिद्ध रंगकर्मी मा.सुशील दत्त करणार आहेत.
——
*परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलन*
चौथ्या सत्रातील परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी कवी व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले तर शरद गढीकर (आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त ), विनोद इंगळे (अध्यक्ष, सत्यशोधक समिती, अमरावती) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन गझलकार देवीलाल रौराळे, सुशांत मेश्राम करणार असून या परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलनामध्ये शंकरभाऊ सोनारे, सविता पाचघरे, राहुलजी कुबडे, प्रवीण कांबळे,डॉ. नंदकिशोर दामोधरे, पद्माकर मांडवधरे स्नेहल सोनटक्के, देवानंद पाटील, प्रा. हर्षवर्धन तायडे,अविनाश गोंडाने, दिलीप शापामोहन,गौरव राऊत, शारदा गणोरकर,पद्मा घरडे, सुनिता मेश्राम,रमेश राऊत, दिनकर मडकवाडे,अविनाश रोकडे,नकुल नाईक,वैशाली आमले आदी निमंत्रित कवी उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनाचे पाचवे सत्र हे समारोपीय सत्र राहणार असून या सत्रामध्ये सत्कार समारंभ आणि संस्थापक संयोजक समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड ठराव वाचन करणार आहेत.या साहित्य संमेलनामध्ये वसंतराव तडस, प्रकाशराव भोजने,मोतीराम बेलसरे, भाऊराव देवघरे, ॲड. रामभाऊ गणोरकर, वामनराव भडके, मदनलाल शर्मा,रमेश भोजने, पांडुरंग पाटील,रवींद्र वासनकर, मनोहर पाटील,मोहन भोजने, नारायण मेंढे (वृक्षमित्र), डॉ. रवींद्र कुबडे, अरुण दामले, गोवर्धन मेंढे,जितेंद्र फुटाणे तर विशेष उपस्थितीमध्ये नानासाहेब धारमकर, श्रीपादराव ढोमणे,आशा खासबागे, उषा साबळे,नूतन बोबडे, ललिता कांबळे,साहेबराव निंभेकर, नंदा यावले,हरिभाऊ वानखडे, विष्णू टाकळे,पंजाब ढोरे, भाऊराव गाडबैल,रामदास राऊत, सुभाष वासनकर,अनिल भोयर, मंदा हिवरे,पुंडलिक वानखडे, प्रभाकर सोनारे,जानरावजी कोरडे, श्रीमती वेणुताई सुपले, श्रीमती पुष्पाताई खोडस्कर,भास्कर येवले, दिलीप पोकळे, श्रीकांत साखरे, वसंत कवठकर, जानराव नांदणे आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वोदय शिक्षण समिती, हिवरखेड व वऱ्हाड विकास, अमरावतीचे सदस्य, महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सौ.गंगाबाई सी. चौधरी कन्या हायस्कूल हिवरखेडचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक , प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेऊन जय्यत तयारी करीत आहेत.असे एका पत्रकाद्वारे आयोजकांनी कळविले आहे.