✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
भंडारा(दि.23नोव्हेंबर):- महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला सर्वत्र विधानसभा निवडणूक पार पडल्या. जनतेनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत 20 नोव्हेंबर रोजी मतदान केले. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत प्रचार मोठ्या धुमाळीत करण्यात आला होता.
भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा मतदारसंघातील जुनेच प्रतींधीना विश्वासात घेऊन जनतेनी पसंती दर्शवली. भंडारा विधानसभा क्षेत्रातून नरेंद्र भोंडेकर शिवसेना (शिंदे गट), तुमसर विधानसभा क्षेत्रातून राजुभाऊ कारेमोरे (राका अ. प. ग.), साकोली विधानसभा क्षेत्रातून नानाभाऊ पटोले (काँग्रेस) वीजयी झाले.
*जिल्ह्यातील विजयी उमेदवार*
🔺भंडारा:-नरेंद्र भोंडेकर – 39008 मतांनी विजयी , पराजित पूजा ठवकर, (काँग्रेस)
🔺साकोली:-नानाभाऊ पटोले – 208 मतांनी विजयी, पराजित अविनाश ब्राह्मणकर, (भाजप)
🔺तुमसरः-राजुभाऊ कारेमोरे – 64305 मतांनी विजयी, पराजित चरण वाघमारे , (शप गट)